मित्राला साथ दिली अन् 3 नराधमाच्या तावडीत अडकला अन् रुममध्ये… ; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Crime News : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण आयुष्याची मोठी बचत खर्च करतात. मात्र विश्वासाच्या आधारावर केलेले काही व्यवहार नंतर मोठा धक्का देतात. वसई परिसरातील एका ताज्या प्रकरणामुळे अशा व्यवहारांमध्ये अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा समोर आली आहे.

News18
News18

वसई : वसई पूर्वेतील राजावली या परिसरातून एक धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आलेला आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विकास विश्वकर्मा, मुस्तकिन, मोनू पांडे यांनी तिन्ही आरोपीने तक्रारदार आणि त्यांच्या मित्राचा विश्वास पूर्णपणे जिंकून घेतला. त्यानंतर याच तिन्ही आरोपींनी राजावली येथील असलेल्या एका परिसरातील एक दोन रुम देण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर रुमच्या या व्यवहारासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मित्राकडून तब्बल पाच लाख 24 हजार रुपये स्वीकारण्यातही आले. ही मोठी रक्कम काही प्रमाणात चेक तर काही रोख स्वरुपात देण्याचे ठरवण्यात आले होते. पैसे घेतल्यानंतर तुम्हाला लवकरच रुमचा ताबा मिळेल, असे ही आरोपींनी सांगितले. अनेक दिवस गेले पण रक्कम घेतल्यानंतरही आरोपींनी आजपर्यंत कोणत्याही रुमचा ताबा दिला नाही शिवाय वारंवार पैशाची मागणी करुन ती आपले पैसे परत दिले नाहीत, त्यामुळे आपली यात फसवणूक झाली आहे असे लक्षात येताच तक्रारदारांनी तातडीने आरोपींकडे पैशांची मागणी केली.

पैसे परत मागितल्यान आरोपींकडून तक्रारदाराला शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तक्रारदारांनी तातडीने पोलिस ठाण्यात गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणात सखोल तपास करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणामुळे घर खरेदी किंवा रूमबाबत कोणताही व्यवहार करताना संबंधित कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अधिकृत नोंदी तपासणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

मित्राला साथ दिली अन् 3 नराधमाच्या तावडीत अडकला अन् रुममध्ये… ; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *