54 तासांपर्यंत बॅटरी लाईफ आणि ANC सपोर्टसह Oppo Enco Air 5 नवीन इअरबड्स लाँच, जाणून घ्या किंमत – Marathi News | Oppo Enco Air 5 earbuds launched with up to 54 hour battery life and ANC support check the price


ओप्पो कंपनीने त्यांचे Enco Air 5 ट्रू वायरलेस स्टिरिओ इअरफोन्स भारतात लाँच केले आहेत. या नवीन इअरबड्समध्ये 12 मिमी टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. तसेच यात 52dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनचा सपोर्ट आहे. तसेच उपकरणांवर हे इअरबड्स फास्ट चार्जिंग, एआय असिस्टंट आणि एआय ट्रान्सलेशनलाही सपोर्ट करतात. चला तर मग या खास इअरबड्सची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात ओप्पो एन्को एअर 5 इअरबड्सची किंमत

या नवीन ओप्पो इअरबड्सची किंमत 3 हजार 299 रूपये असून ते मिडनाईट ब्लॅक आणि लॅव्हेंडर पर्पल या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. मर्यादित कालावधीत लाँच ऑफरचा भाग म्हणून हे इअरबड्स तुम्हाला 3 हजार 99 रूपयांच्या या विशेष किमतीत खरेदी करता येतील.

ओप्पो एन्को एअर 5 ची वैशिष्ट्ये

या ओप्पो इअरबड्समध्ये 12 मिमी टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. ते 52dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करतात आणि त्यात ट्रान्सपरन्सी मोडदेखील आहे. ते SBC आणि AAC ब्लूटूथ कोडेक्सना सपोर्ट करतात. या इअरबड्समध्ये सहा मायक्रोफोन्स (प्रत्येक इअरबडवर तीन) आहेत आणि व्हॉइस कॉल दरम्यान बॅकग्राउंड आवाज कमी करण्यासाठी ते AI-आधारित कॉल नॉइज कॅन्सलेशनचा वापर करता येणार आहे.

हे इअरबड्स ब्लूटूथ 6.1 कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतात आणि त्यांची वायरलेस रेंज 10 मीटरपर्यंत आहे. यामध्ये प्लेबॅक, ट्रॅक बदलणे, व्हॉइस असिस्टंट वापरणे आणि कॉल्स मॅनेज करण्यासाठी टच कंट्रोल्सची सुविधा देखील आहे. सुसंगत उपकरणांमध्ये एआय असिस्टंट आणि एआय ट्रान्सलेटची सुविधादेखील उपलब्ध आहे.

बॅटरी आणि बॅटरी लाईफ: प्रत्येक इअरबडमध्ये 62mAh बॅटरी आहे आणि चार्जिंग केसमध्ये 530mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की ANC बंद असताना 13 तासांपर्यंत आणि चार्जिंग केससह 54 तासांपर्यंत प्लेबॅक मिळतो. ANC किंवा ट्रान्सपरन्सी मोड चालू असताना, इअरबड्स 6.5 तासांपर्यंत प्लेबॅक देतात आणि चार्जिंग केससह 27 तासांपर्यंत प्लेबॅक मिळतो. ANC बंद असताना टॉक टाइम आठ तासांपर्यंत असतो.

ओप्पोच्या म्हणण्यानुसार हे इअरबड्स चार्ज होण्यासाठी सुमारे 55 मिनिटे लागतात, तर यूएसबी टाइप-सी पोर्ट असलेल्या इअरबड्स आणि चार्जिंग केसला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 90 मिनिटे लागतात. कंपनीचा दावा आहे की, चार्जिंग केससह 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 11 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक मिळू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *