भारती सिंहला उलट उत्तर देणाऱ्या ‘गोला’चा व्हिडीओ तुफान व्हायरल, उत्तर ऐकून सर्व थक्क – Marathi News | Bharti singh son gola hilarious reply on marriage on being scolded see video


प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका भारती सिंह आपल्या विनोदी स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. टीव्ही शोसोबतच ती तिच्या यूट्यूब व्लॉगमधून चाहत्यांशी सातत्याने जोडलेली असते. या व्लॉगमध्ये ती पती हर्ष लिंबाचिया आणि दोन्ही मुलांसोबतचे मजेशीर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे तिचा मोठा मुलगा ‘गोला’ आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

अलीकडेच भारतीने शेअर केलेल्या एका व्लॉगमधील व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारती आपल्या मुलगा गोलाला एका गोष्टीवरून समज देताना म्हणते, ‘इतकी जास्त जीभ चालवू नकोस. नाहीतर तुझं लग्न होणार नाही.’ यावर गोलाने क्षणाचाही विलंब न लावता दिलेलं उत्तर ऐकून भारतीलाही धक्का बसतो. तो म्हणतो, ‘मग तुमचं लग्न कसं झालं?’ मुलाच्या या भन्नाट उत्तरावर भारती काही क्षण निरुत्तर होते आणि नंतर हसत म्हणते, ‘हा अगदी त्याच्या बाबावर गेला आहे. खूपच तोंडाळ आहे.’

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, गोला दिवसेंदिवस अधिकच हुशार होत चालला आहे. तर दुसऱ्याने म्हटले, भारतीजी, मुलगा अगदी तुमच्यावरच गेला आहे.

हर्ष-भारतीची मजेशीर शाब्दिक चकमकही चर्चेत

याच व्लॉगमधील आणखी एका व्हिडिओमध्ये भारती जेवण करताना दिसते. त्यावेळी हर्ष लिंबाचिया तिची मजा घेत म्हणतो, ट्रक ड्रायव्हरसारखी बसून जेवते आहे. हर्षच्या या टोमण्यावर भारतीही लगेच प्रत्युत्तर देत म्हणते, चिखलात दगड फेकलात तर चिखल तुमच्यावरच उडणार. यावर हर्ष म्हणतो, म्हणजे तू चिखल आहेस? त्यावर भारती शांतपणे उत्तर देते, आणि तुम्ही दगड आहात.

त्यानंतर हर्ष गोलाकडे पाहत गंमतीने म्हणतो, अरे माझ्या कंकडा… यानंतर गोलाने पुन्हा एक भन्नाट उत्तर दिले. त्याचे उत्तर ऐकून हर्ष हसत म्हणतो, अरे यार, ही कसली फॅमिली आहे!

गोला आणि काजूबद्दल…

भारती आणि हर्ष यांचा मोठा मुलगा ‘गोला’ याचे खरे नाव लक्ष सिंह आहे. त्याचा जन्म 3 एप्रिल 2022 रोजी झाला. आपल्या निरागस स्वभावासोबतच विनोदी आणि चपळ उत्तरांमुळे तो सोशल मीडियावर अनेकांचा लाडका बनला आहे.

दरम्यान, डिसेंबर 2025 मध्ये भारती सिंहने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव यशवीर असून घरातील सर्वजण त्याला प्रेमाने ‘काजू’ या टोपणनावाने हाक मारतात. भारती आपल्या दोन्ही मुलांसोबतचे अनेक गोड आणि मजेशीर क्षण व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *