ठाण्यात पावसाचा कहर, कल्याण- डोंबिवलीसह ‘या’ 7 शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; 24 तासांसाठी रेड अलर्ट | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Thane Rain: हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यात उद्या ( शनिवारी ) रेड अलर्ट जाहीर रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Thane Red Alert
Thane Red Alert

ठाणे : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाने झोडपले आहे. हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यात उद्या ( शनिवारी ) रेड अलर्ट जाहीर रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ठाण्यात दोन दिवसांचे पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. जोरादार वा-यासह मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर 

ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर येथील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कल्याण या संबंधित आदेश जारी केले आहेत, अस असलं तरी मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावं लागणार आहे.

4 ते 6 जुलै मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

ठाण्यात पावसाचा कहर, कल्याण- डोंबिवलीसह ‘या’ 7 शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; 24 तासांसाठी रेड अलर्ट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *