Gold Price Today : आज काही खरं नाही, सोन्याच्या किमतींनी भर पावसाळ्यातही फोडला घाम ! 10 ग्रॅमच्या दरात तर.. – Marathi News | Gold silver price today 03 July 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune


3 जुलै रोजी सोन्याची किंमत किती ?

सोन्याच्या वाढत्या भावांनी देशातील नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे. भारतात सोन्याचे भाव वाढणं सुरूच आहे. 3 जुलैच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये दरांमध्ये आणखी वाढ झाली. राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४३,९४० रुपयांवर पोहोचला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९% शुद्ध सोन्याच्या दरात ३,००० रुपयांची मोठी वाढ झाली आणि तो दर प्रति १० ग्रॅमसाठी १,४७,५०० रुपयांवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढते भाव आणि कमकुवत होत चाललेले डॉलर यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस ४,१४४.८३ डॉलर्स इतका आहे. सोन्याचे भाव वाढल्याने लोकांचं टेन्शन पुन्हा वाढलं असून खरेदीचा प्लान पुढे ढकलावा लागतोय की काय अशी चिंता ग्राहकांना सतावू लागली आहे.

यूएस फेडरल रिझर्व्ह बोर्डाचे सदस्य केविन वॉर्श यांनी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी कठोर भूमिका घेतली आहे, त्यामुळे नजीकच्या काळात व्याजदरवाढीबद्दलची चिंता कमी झाली आहे. याव्यतिरिक्त, अपेक्षेपेक्षा कमकुवत आलेल्या अमेरिकेच्या रोजगारविषयक आकडेवारीनेही व्याजदरवाढीच्या अपेक्षा कमी होण्यास हातभार लावला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, यूएस डिपार्टमेंट ऑफ लेबरच्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने जूनमध्ये बिगर-शेती रोजगारसंख्येत ५७,००० नोकऱ्यांची वाढ झाल्याचे नोंदवण्यात आल्ं आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव पाहिलेत का ?

राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४३,९४० रुपये तर २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३१,९६० रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबई तसेच कोलकातामध्ये २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३१,८१० रुपये आहे, तर २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४३,७९० रुपये आहे.

चेन्नईत सोन्याचे दर सर्वाधिक आहेत. तिथे २४-कॅरेट सोन्यासाठी १,४६,१९० रुपये आणि २२-कॅरेटचया 10 ग्रॅम सोन्यासाठी १,३४,०१० रुपये मोजावे लागत आहेत. तर पुणे आणि बेंगळुरू ​​या दोन्ही शहरांमध्ये २४-कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४३,७९० रुपये आहे आणि २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३१,८१० रुपये आहे.

विविध शहरातील सोन्याचे भाव घ्या जाणून

चांदीच्या दराचं काय ?

सोन्याप्रमाणेच आणखी एक मौल्यवान धातू असलेल्या चांदीच्या किमतीतही आज वाढ होताना दिसून आली. ३ जुलैच्या सकाळी चांदीचा भाव प्रति किलो २,४५,१०० रुपयांवर पोहोचला. औद्योगिक आणि गुंतवणुकीच्या उद्देशाने वाढलेल्या मागणीमुळे चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट सिल्व्हर’चा (तात्काळ उपलब्ध चांदीचा) भाव प्रति औंस ६१.२८ इतका आहे. सोने आणि चांदीच्या देशांतर्गत किमतींवर स्थानिक तसेच जागतिक घटकांचा प्रभाव पडत असतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *