उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जाम झापलं, फक्त मारायचचं… फायर ब्रँड नेत्याच्या दाव्याने खळबळ; अहिर येताच… – Marathi News | Uddhav Thackeray Scolded Sanjay Raut: Bachchu Kadus Explosive Claim Rocks Politics


ठाकरेंचे आधी सहा खासदार फुटले. त्यानंतर सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला आणि विधान परिषदेचं उपसभापतीपदही मिळवलं. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या निमित्ताने सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. राऊत सकाळीच येऊन काहीही बोलत असतात. शिव्या घालतात. त्यांच्या बेताल विधानांना कंटाळूनच नेते पक्ष सोडून जात आहेत, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने तर वेगळाच दावा करून मोठा गहजब उडवून दिला आहे.

सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाचे फायर ब्रँड नेते बच्चू कडू यांनी थेट संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. आता आमच्याकडे सचिन आले तर त्यांची तर त्यांची टीमही येणार हे नक्की. मित्र म्हणून त्यांना आम्ही स्वीकारू. एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला महाराष्ट्रातून मजबूत करण्याचं काम केलं आहे, असं सांगतानाच संजय राऊतांमुळे पक्षात खूप नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thakrey) राऊतांना खूप झापले आहे. फक्त मारायचे बाकी राहिलं होतं, असा खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे.

तो निर्णय केंद्राचा

राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर बच्चू कडू यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय दिल्लीचा विषय आहे. तो निर्णय वरिष्ठांचा आहे, असं ते म्हणाले. तसेच आमच्या वाट्याला मंत्रीपद आले म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला येणार, असंही त्यांनी सांगितलं. आमच्यात कोणतीच नाराजी नाहीये. पक्ष मजबूत करणं हाच आमचा अजेंडा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संकटात सोबत…

राज्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. निसर्ग कोपला तर शिवसेनेने मदतीला धावलं पाहिजे, असं शिंदे यांना वाटतं. त्यांनी त्या संदर्भात आम्हाला सूचना केल्या आहेत. त्याचं आम्ही पालन करणार आहोत. संकटात आम्ही जनतेच्या सोबत आहोत. शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असं त्यांनी म्हटलंय.

परीक्षा ऑफलाईनच घ्या

टीईटीचा पेपर फुटल्याच्या प्रकरणावरही त्यांनी मत व्यक्त केलं. पेपर फोडणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. सैन्या भरतीच्या धर्तीवर परीक्षा ऑफलाईनच घेतल्या पाहिजे. 6 जुलैपूर्वी निर्णय होणे अपेक्षित आहे, असं ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *