Mumbai Sakinaka Manhole : मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू


मुंबई : मुंबईमध्ये साकीनाका खैरानी रोडवरती उघड्या असलेल्या मॅनहोलमध्ये एक माणूस पडलेला आहे. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये तुफान पाऊस बरसतोय आणि त्यादरम्यानच (Mumbai Sakinaka Manhole) ही घटना समोर आलेली आहे. साकीनाका परिसरातली ही घटना आहे. एका मॅनहोलमध्ये हा माणूस पडलेला आहे. त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होत्या काही वेळात त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं मात्र, त्याचा मृत्यू झाल्याची (Mumbai Sakinaka Manhole) माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या साकीनाका परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. कालपासूनच मुंबईमध्ये तुफान असा पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे आणि त्यामध्येच आता एक उघडा मॅनहोल (Mumbai Sakinaka Manhole) होता, आणि याच मॅनहोलमध्ये फोनवरती बोलत जात असणारा एक व्यक्ती पडलेला आहे अशी माहिती समोर आली होती. या पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. याआधी देखील मुंबईच्या महापूर रितू तावडे जेव्हा पाहणी दौऱ्यावरती निघालेल्या होत्या त्याच वेळी पालिकेचा एक कर्मचारी देखील अशाच पद्धतीने मॅनहोलमध्ये पडलेला होता आणि त्यानंतर ही दुसरी घटना समोर येते साकीनाका परिसरामधली घटना आहे साकीनाका खैरानी रोडवरती मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला.(Mumbai Sakinaka Manhole)

 Mumbai Sakinaka Manhole : तो व्यक्ती मॅनहोलमध्ये कसा पडला?

साकीनाका परिसरातील एका मॅनहोलमध्ये हा व्यक्ती पडला, तो मॅनहोल उघडा होता, त्या ठिकाणी काम सुरू होतं, त्याचवेळी अंदाज न आल्याने तो व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला. त्याला रेस्क्यू करण्यात आलं, मात्र त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. साकीनाका येथील खैरानी रोडवरील सन्मान हॉटेलच्या जवळ उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती मोबाईलवरती बोलत असताना ती खाली पडली, असल्याची माहिती समोर आली आहे.

साकीनाका येथील खैरानी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना ही व्यक्ती खाली पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री व चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. MFB, पोलीस, 108 रुग्णवाहिका व संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू होते. दरम्यान, येथील मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती साधारण 45 वर्षांचा असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून त्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते, अस्लम अन्सारी असं या व्यक्तीचं नाव आहे, रेस्क्यू ऑपरेशन करून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.

Mumbai Sakinaka Manhole : साधारणत 20 ते 25 फूट खोल मॅनहोल

साधारणत 10:30 वाजताच्या सुमारास ही व्यक्ती या ठिकाणी पडलेली होती, आणि ती थेट साधारण 15 ते 20 फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमध्ये वाहून आलेली होती. सध्या घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी आणि सर्वच पक्षीय या ठिकाणचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते आणि या माणसाला रेस्क्यू करण्याचं काम सुरू होतं. साधारणत 20 ते 25 फूट खोल हे मॅनहोल आहे, काही कामानिमित्त हे मॅनहोल खुलं करण्यात आलेलं होतं, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस असतील आणि सगळ्या त्यांचे काही नातेवाईक आहेत, अस्लम अन्सारी असं या व्यक्तीचं नाव आहे, त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. पाऊस वाढला होता तर परत घरी जात होते, लोकं काही काम करत होते, पण त्यांना काय लोकांच्या जीवाशी काही घेणं देणं नाही, काय लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी काही ठेवलं नव्हतं बॅरिकेट काही नव्हते. उघड्यावरती काम चालू होतं, त्याच्यामध्ये माझा भाऊ पडला आहे अशी माहिती मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीच्या भावाने दिली आहे.

 

 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *