पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याबद्दलचे नवे आणि धक्कादायक खुलासे (Ketan Agrawal Case Pune) समोर येत आहेत. आता सिया गोयलचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामध्ये ती एका पबमध्ये हातात बिअरची (Ketan Agrawal Case Pune) बाटली घेऊन फोनवर कोणालातरी भयंकर शिवीगाळ करताना दिसत आहे. दुसरीकडे, सियाच्या पोलीस कोठडीचा उद्या (३ जुलै) शेवटचा दिवस असल्याने पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.(Ketan Agrawal Case Pune)
Ketan Agrawal Case Pune: डिसेंबर २०२५ चा पबमधील व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला सिया गोयलचा हा व्हिडिओ डिसेंबर २०२५ मधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये सिया एका पबमध्ये उभी असल्याचे दिसतेय. तिच्या एका हातात बिअरची बाटली असून ती दुसऱ्या हाताने फोनवर कोणाशीतरी मोठ्या आवाजात बोलत आहे. फोनवर बोलताना ती अत्यंत मोठ्या आवाजात आणि अश्लील शिव्यांचा वापर करताना कथितरीत्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिच्या या आक्रमक वर्तनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या स्वभावाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.(Ketan Agrawal Case Pune) यासंदर्भातील वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
सिया गोयल आणि चेतन चौधरीचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/CDBhdXXdna
— VIRALबाबा (@viralmedia70) July 1, 2026
यापूर्वी, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघे महाराष्ट्र क्रिकेट लीगचा (MCL) सामना एकत्र पाहतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याशिवाय त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, त्यावरून त्या दोघांमध्ये आधीपासूनच प्रेमसंबंध होते, या दाव्याला बळ मिळत आहे.
Ketan Agrawal Case Pune: शेवटच्या दिवशी पोलीस ॲक्शन मोडमध्ये; सियाच्या घरातून कपडे जप्त
वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाच्या पोलीस कोठडीचा आजचा दिवस तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरुवारी पोलिसांनी पंचनाम्याची कायदेशीर कारवाई करण्यासाठी सियाला थेट तिच्या कोंढवा येथील ‘लीलाकुंज’ या घरी नेले होते. गुन्ह्याच्या दिवशी (१८ जून) सियाने कोणते कपडे परिधान केले होते, ते कपडे जप्त करण्यासाठी आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस तिला घेऊन तिच्या घरी पोहोचले होते.
सुमारे तासभर पोलीस सियाच्या घरात होते. यावेळी सियाचे कुटुंबीय देखील घरात हजर होते. आवश्यक ती पडताळणी आणि गुन्ह्याशी संबंधित कपडे जप्त केल्यानंतर पोलीस सियाला घेऊन तिथून रवाना झाले.
Ketan Agrawal Case Pune: उद्या संपणार पोलीस कोठडी; पुढील रणनीतीकडे लक्ष
३ जुलै रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे आतापर्यंत गोळा केलेले तांत्रिक पुरावे, आरोपींची समोरासमोर केलेली चौकशी, ‘क्राइम सीन री-क्रिएशन’ आणि जप्त केलेल्या वस्तूंच्या आधारे पोलीस न्यायालयात कोणती भूमिका मांडतात आणि त्यांची कोठडी वाढवून मिळण्याची मागणी करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नव्या व्हायरल व्हिडिओवर तपास यंत्रणांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही, मात्र यामुळे हे हत्याकांड महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे.
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?