Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार


Beed Crime News: बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील बेकायदेशीर आणि विनापरवाना सुरू असलेल्या ‘जगदंबा कला केंद्रा’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नेकनूर पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) बीड यांच्या संयुक्त पथकाने या कलाकेंद्रावर अचानक छापा (Raid) टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 8 महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेतले असून, एक आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

Beed Crime News: परवान्याशिवाय सुरू होते कलाकेंद्र

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. उदंड वडगाव येथील जगदंबा कला केंद्र चालवण्यासाठी मालकांकडे कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. कोणत्याही प्रशासकीय परवानगीशिवाय हे कलाकेंद्र छुप्या पद्धतीने चालवले जात होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, आरिफ आसिफ शेख आणि शफिक अली मोमीन नावाचे दोन इसम हे सदर कलाकेंद्र चालवत असल्याचे समोर आले आहे.

Beed Crime News: नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या संयुक्त कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून संशयितांना ताब्यात घेतले असून, फरार झालेल्या एका आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या संपूर्ण बेकायदेशीर कृत्याप्रकरणी आरिफ शेख आणि शफिक मोमीन याच्यासह संबंधितांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलाकेंद्राच्या आडून का बेकायदेशीर प्रकार सुरू होते का? या दृष्टीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि नेकनूर पोलीस पुढील तपास करत आहेत.  

Beed News: वादातील प्लॉट केला पत्नीच्या नावे, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलंबित 

दरम्यान, माजलगाव शहरालगतच्या एका वादग्रस्त भूखंडावरील फेरफार स्वतःच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या नावे बेकायदेशीरपणे मंजूर केल्याप्रकरणी तलाठी संघटनेच्या अध्यक्षाला मोठा फटका बसला आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत ते दोषी आढळल्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित तलाठ्याला शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

रूपचंद आभारे असे निलंबित करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून, त्यांच्याकडे माजलगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा पदभार होता. तलाठी संघटनेचे अध्यक्ष असल्याने ते मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. त्याचाच गैरफायदा घेत त्यांनी माजलगाव शहरालगतच्या गट क्रमांक 105 मधील न्यायप्रविष्ट जमिनीवर खरेदीखताच्या आधारे एकाच दिवशी तब्बल 12 फेरफार मंजूर केल्याचा आरोप आहे.

यातील धक्कादायक बाब म्हणजे काही फेरफार त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या, तर काही नातेवाईकांच्या नावे मंजूर केल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *