आज शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी अर्ज दाखल करण्यात आला. दोन आठवड्यात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी थेट शिवसेना एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. शिवसेना शिंदे गटाने थेट सचिन आहिर यांना विधान परिषदेचा उमेदवार म्हणून घोषित केले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सचिन आहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना म्हणावा लागेल. कोणालाही विश्वास बसणार नाही, अशा घडामोडी घडताना दिसल्या. थेट सचिन आहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाकडून आहे. त्यामध्येच थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला. ही निवडणुक बिनविरोध होणार नाही. विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा होती. पण सचिन आहिर यांना उमेदवारी देण्यात आली. आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे स्वत: सचिन आहिर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यातील महत्वाचे नेते उपस्थित होते.
यादरम्यान सचिन आहिर यांच्या उमेदवारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली. त्यांनी थेट यावर भाष्य केले. एकनाथ शिंदे आणि सचिन आहिर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकत्र बाहेर पडताना दिसले. यावेळी एकनाथ शिंदे यांचा चेहरा सर्वकाही सांगून जाताना दिसला. माध्यमांनी त्यांना सचिन आहिर यांच्या उमेदवारीवर प्रश्न विचारला.
यावर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हटले की, मी सर्वकाही पत्रकार परिषदेमध्ये बोलेल. एकनाथ शिंदे यांच्याकडून दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. तिथेच ते या उमेदवारीबद्दल बोलताना दिसलीत. एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीदरम्यान थेट मोठा गेम फिरवला आहे. हा थेट मोठा धक्का आहे. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत.