Ind vs Eng 1st T20 : ‘श्रेयस अय्यरला वैभव सूर्यवंशी आवडत नाही…’, संजू सॅमसन फ्लॉप अन् चाहते भडकले; गौतम गंभीरला म्हटले घमंडी


India vs England 1st T20 : भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा अधिकच वाढली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी-20 सामन्यांत वैभवला प्लेइंग इलेव्हनबाहेर बसावे लागले होते, आणि आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही त्याला संधी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने सलामीवीर म्हणून पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यावरच विश्वास दाखवला. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन अवघा 1 रन काढून बाद झाला, ज्यावरून क्रिकेट चाहते सोशल मीडियावर प्रचंड संतप्त झाले आहेत.

संजू सॅमसनचा यूके दौरा अत्यंत निराशाजनक

संजू सॅमसनसाठी हा यूके (UK) दौरा आतापर्यंत अत्यंत खराब राहिला आहे. आयर्लंडविरुद्ध पहिला सामना शून्यावर आऊट झाला, त्यानेतर आयर्लंडविरुद्ध दुसरा सामना फक्त 5 धावा केल्या, आता इंग्लंडविरुद्ध पहिला सामना तो 1 धाव करू तंबुत परतला. सॅमसन या दौऱ्यातील 3 सामन्यांमध्ये मिळून फक्त 6 धावा करू शकला आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी संघ व्यवस्थापनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.

3 सामन्यांत फक्त 6 धावा; वर्ल्ड कपचा हिरो ठरला फ्लॉप

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अखेरच्या तीन डावांत सलग तीन अर्धशतके झळकावून संजू सॅमसनने भारताला विश्वविजेता बनवण्यात मोलाचे योगदान दिले होते. मात्र, त्यानंतर जेव्हा तो पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत मैदानात उतरला, तेव्हा फॉर्मने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. या दौऱ्यावर त्याची बॅट पूर्णपणे शांत असल्याचे पाहायला मिळत आहे. संजू सॅमसनच्या फ्लॉप शोमुळे सोशल मीडियावर केवळ त्याच्यावरच नाही, तर कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही जोरदार टीका होत आहे.

चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया 

एका युझरने लिहिले, “श्रेयस अय्यरला वैभव सूर्यवंशी कधीच आवडत नाही, म्हणूनच त्याने वैभवला सलग तिसऱ्या सामन्यात संधी दिली नाही.” दुसऱ्या एका युझरने सॅमसनवर निशाणा साधत म्हटले, “सॅमसन जेवढ्या धावा तीन डावांत करतो, तेवढ्या धावा वैभव सूर्यवंशी फक्त एका चेंडूवर करू शकतो.” इतकेच नव्हे तर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला चाहत्यांनी ‘घमंडी’ म्हटले आहे. एका युझरने गंभीरवर टीका करताना लिहिले, “गंभीरला वाटते की सॅमसन हा वैभवपेक्षा मोठा खेळाडू आहे, पण गंभीरचा हाच घमंड भारतीय क्रिकेट उद्ध्वस्त करेल.”

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग-11 : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा –

Ind vs Eng 1st T20 : डेब्यू मॅचमध्ये 3 विकेट्स, पहिल्याच चेंडूवर षटकार; तरीही टीम इंडियातून थेट OUT… कोण आहे ‘तो’ खेळाडू?, श्रेयस अय्यरच्या निर्णयावर चाहते भडकले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *