Team India: नंबर वन बॅट्समन चार तासात झिरो… आयर्लंडनंतर आता इंग्लंड, वर्ल्ड चॅम्पियन टीमचे दिवस फिरले! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

आयर्लंडविरुद्धची टी-20 सीरिज 2-0 ने गमावल्यानंतर भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध चांगली सुरूवात करेल, असं वाटत होतं पण पुन्हा एकदा टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

नंबर वन बॅट्समन चार तासात झिरो... आयर्लंडनंतर आता इंग्लंड, वर्ल्ड चॅम्पियन टीमचे दिवस फिरले!
नंबर वन बॅट्समन चार तासात झिरो… आयर्लंडनंतर आता इंग्लंड, वर्ल्ड चॅम्पियन टीमचे दिवस फिरले!

डरहॅम : टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजला सुरूवात झाली आहे. आयर्लंडविरुद्धची टी-20 सीरिज 2-0 ने गमावल्यानंतर भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध चांगली सुरूवात करेल, असं वाटत होतं पण पुन्हा एकदा टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुढच्याच आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये आयर्लंडसारख्या अनुभव नसलेल्या टीमसमोर पराभवाची नामुष्की ओढावल्यामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठली.

इंग्लंडविरुद्धही खराब सुरूवात

आयर्लंडविरुद्धच्या सीरिजनंतर टीम इंडियाच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती, पण पुन्हा एकदा टीम इंडियाला सुरूवातीलाच धक्के बसले. ओपनर संजू सॅमसन 7 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाला. टी-20 वर्ल्ड कपच्या लागोपाठ 3 नॉकआऊट सामन्यांमध्ये 3 अर्धशतकं करणारा संजू सॅमसन आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात 5 रन दुसऱ्या सामन्यात शून्य आणि आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 1 रनवर आऊट झाला.

इशान किशनही डकवर माघारी

संजू सॅमसनची विकेट पडल्यानंतर बॅटिंगला आलेला इशान किशन 2 बॉलमध्ये शून्य रनवर आऊट झाला. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर इशान किशनने मिड ऑनच्या दिशेने शॉट मारला आणि रन काढण्यासाठी धावला, पण इशान अर्ध्या पिचवर आल्यानंतर अभिषेकने त्याला माघारी पाठवलं, यात इशान किशन रनआऊट झाला. मैदानातल्या या गोंधळानंतर इशान किशन अभिषेक शर्मावर चांगलाच नाराज झाला.

नंबर वन होताच इशान झिरो

काहीच तासांपूर्वी आयसीसीच्या टी-20 बॅटिंगच्या क्रमवारीमध्ये इशान किशन नंबर वन झाला होता. अभिषेक शर्माला इशानने पहिल्या क्रमांकावरून मागे टाकलं होतं, पण टी-20 रँकिंगमध्ये नंबर वनवर येताच इशान शून्य रनवर आऊट झाला.

कॅप्टन श्रेयसचे धक्कादायक निर्णय

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रेयसच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. डरहॅममध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असताना डकवर्थ लुईस नियमानुसार मॅचचा निकाल लागू शकतो, हे माहिती असतानाही श्रेयस अय्यरने आधी बॅटिंग घेतली. तसंच ढगाळ वातावरण आणि खेळपट्टी फास्ट बॉलिंगला मदत करणारी असतानाही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 स्पिनर आहेत.

भारताची प्लेइंग इलेव्हन

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *