Parbhani Accident News : परभणीच्या कोल्हा गावाजवळ आयशर आणि कारचा भीषण अपघात (Parbhani Accident) झाल्याची घटना घडली आहे. अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आयशरचा चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान अपघात एवढा भीषण होता की या कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कार पूर्ण चकनाचूर झाली
परभणीच्या मानवत तालुक्यातील कोल्हा येथील उड्डाण पुलाजवळ आयशर आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात होऊन कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात आयशर चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एर्टिगा कारमध्ये गणेश निर्मळ आणि माऊली निर्मळ हे दोघेजण प्रवास करत होते. त्यानंतर कार आणि पुढून येणाऱ्या आयशर मध्ये अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्ण भाग हा चकनाचूर झाला आहे. ज्यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात आयशर चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
भिवंडीत धक्कादायक घटना, विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
भिवंडीत धक्कादायक घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील तीनबत्ती परिसरातील एका दुकानात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या स्वीटच्या दुकानातील भांडी बाजूला असलेल्या मंदिरात ठेवली जात होती. ही भांडी मयत मुस्तफा घेऊन येत असताना त्याला विजेचा धक्का लागला. जखमी अवस्थेत मुस्तफा यास स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आमच्या मुलाचा मृत्यू दुकानदाराच्या हलगर्जीपना व निष्काळजीपणाने झाला असून या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मयत मुस्तफा शेख यांच्या परिवाराने केली आहे. या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! सोलापूरच्या सांगोल्यात दोन कारचा भीषण अपघात, आईसह मुलाचा जागीच अंत, सहा जण जखमी
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह