Mumbai Rain Red Alert: मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी


Mumbai Rain Red Alert: मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई परिसरात पावसाच्या जोरदार सरी (Rain) बरसत आहेत. अशातच आता हवामान खात्याने आणखी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात काही ठिकाणी पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबईला तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात मुंबईत मुसळधार पाऊस (Rain) होऊ शकतो. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याने (Weather Alert) पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 72 तासात कोकण आणि घाट माथ्यांवर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट परिसरात देखील अतिमुसळधारेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत पुढील काही तास रेड अलर्ट असला तरी उर्वरित काळ पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल. ठाणे , मुंबई , पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट असेल. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय, विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. (Mumbai Rain news)

ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून महापालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचलं आहे. मुख्य बाजार पेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव, कोपरी बारा बंगला या परिसरातील सखल भागात पाणी साचलं आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली. याशिवाय, पालघर जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरू असून जिल्हातील नदी नाले भरून वाहायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी सखल भागात पाणी ही साचल्याचे पाहायला मिळत आहे. रानशेत, दाभोण भागातून वाहणाऱ्या सुसरी नदीलाही मोठा पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. चांगला पाऊस झाल्याने बळीराजा ही सुखावला आहे. 

Mumbai Rain: मुंबईतील सखल भागांमध्ये साचले पाणी

मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोरेगाव फिल्म सिटी रोड पाण्याखाली गेला आहे.  गोरेगाव फिल्म सिटी रोडवर संतोष नगर परिसरात रस्ता वर दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर दुपारची वेळ आहे शाळकरी मुलं शाळेसाठी निघाले आहेत, मात्र या पाण्यातून त्यांना वाट काढावी लागत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा ते एक तासापासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम उपनगरात जेवढा सखल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरला आहे. मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मालाड सबवे मध्ये एक फूट पाणी भरलं आहे. 

मालाड सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे मालाड पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  मालाड सबवे बाहेर पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मालाड सबवेबाहेर मुख्य नाल्यांचे लोखंडी झाकण तुटले आहे. नाल्याचे झाकण तुटल्यामुळे आणि सबवे मध्ये 1 फूट पाणी भरल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मालाड सबवेमधून पश्चिम परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत.

Nagpur Rain news: विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 ते 72 तासांत विदर्भात समाधानकारक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. आज नागपूर शहरातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. जून महिना उष्ण आणि तुलनेने कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *