तू आमच्या धर्मात ये, तरुणीची अट ऐकताच तरुणाने… चॅट व्हायरल होताच कोल्हापूर-सांगली हादरलं – Marathi News | Sangli youth ended his life alleged religious conversion condition and instagram chats under police probe


सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने सांगलीतील एका 19 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी त्याचे सोशल मीडिया अकाऊंट्स चेक केले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. आता नेमकं काय घडलं होतं जाणून घ्या…

सोशल मीडियाद्वारे कळाले आत्महत्येचे कारण

सांगली शहरात लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्वांक प्रमोद शेवाळे असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीसह दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना मृत दुर्वांकच्या मोबाईल मधील इंस्टाग्राम मधील वेगवेगळ्या अकाउंटवरील चॅट मधून काही गोष्टी समोर आल्या. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

सांगली शहर पोलिसांनी दोघांच्याही सोशल मीडियाचा डाटा सायबर पोलिसांकडून मागविला आहे. मृत दुर्वांक शेवाळे हा पुणे येथे नोकरी करत होता.त्याच्या घराजवळच राहणाऱ्या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी अधूनमधून येत होती. त्या दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा अशी अट दुर्वांकला घातली. या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृतदुर्वांकच्या आई-वडिलांनी केला आहे.

याप्रकरणी दुर्वांकच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार संबंधित तरुणी व तिला मदत करणाऱ्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली आहे. तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. मयत दुर्गांक शेवाळे याच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात आणि शेवाळे कुटुंब यावर शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *