Shani Nakshatra Parivartan 2026 : सावध व्हा! शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 4 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 2 जुलैपासून ‘या’ गोष्टी टाळा


Shani Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाचं (Shani Dev) संक्रमण आणि नक्षत्र परिवर्तन ही ज्योतिष शास्त्रात एक महत्त्वाची घटना मानली जाते. न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनि लवकरच आपल्या नक्षत्रात बदल करणार आहे. द्रिक पंचांगानुसार, उद्या म्हणजेच 2 जुलै 2026 रोजी शनि देव बुधाचे स्वामित्व असलेल्या रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. 

शनिच्या या नक्षत्र परिवर्तनाने सर्व 12 राशींवर गंभीर परिणाम होणार आहे. काही राशींसाठी हा काळ शुभदायक असणार आहे. तर, काही राशींना या काळात सावधानता बाळगण्याची गरज आहे. शनिच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांच्या कामावर तसेच करिअरवर शनि नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम होणार आहे. या कालावधीत तुमच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार जाणवतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे वैचारिक मतभेद जाणवतील. तुमच्या कामात अडथळे जाणवतील. तसेच, कामाच्या ठिकाणी गॉसिपिंगचा हिस्सा होणार नाही याची काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी शनिचं संक्रमण हे तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे निर्माण करणारा ठरणार आहे. या कालावधीत जोडीदाराबरोबर तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात.बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. 

कन्या रास (Virgo Horoscope)

शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने तुमच्या खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत दूरच राहा. तसेच, कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

या कालावधीत जर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केला तर तुम्हाला महागात पडू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्याची घाई करु नका. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                        

Shukra Nakshatra Parivartan 2026 : शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने 4 जुलैपासून सुरु होतोय सुवर्णकाळ; पैसा, नोकरी, प्रसिद्धी, प्रेम सगळं काही झटक्यात मिळणार…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *