July Month Grah Gochar 2026 : जुलै महिन्यात शनि, सूर्य आणि बुधासह ग्रहांचं महासंक्रमण; फक्त 4 राशींचं उजळणार भाग्य, 8 राशींवर संकटाचं सावट…


July Month Grah Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून जुलै (July 2026) महिन्याला सुरुवात झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जुलैचा महिना ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आणि ग्रहांच्या संक्रमणाचा असणार आहे. या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि शनिसारख्या मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम 12 राशींवर होणार आहे. ग्रहांच्या या संक्रमणाने काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना मात्र सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

जुलै महिन्यात होणार ग्रहांचं महासंक्रमण 

द्रिक पंचांगानुसार, सर्वात आधी महिन्याच्या शेवटी बोलायचं झाल्यास, शनि देव कुंभ राशीत आधीपासूनच वक्री अवस्थेत असणार आहे आणि आपल्या हळुवार चालीने राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. तर, 24 जुलै रोजी बुध ग्रहाच्या स्थितीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. बुधाची मार्गी चाल सुरु होणार आहे. त्याआधी, 16 जुलै रोजी सूर्य देव मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच, 4 जुलै रोजी शुक्र देव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

बुध आणि सूर्याच्या संक्रमणाने तुमच्या जीवनात उत्पन्नाची अनेक नवीन साधनं निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा कालावधी अनुकूल असणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती नांदेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

शुक्र आणि सूर्याच्या राशी परिवर्तनाने तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल घडवून आणेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

जुलै महिन्यात ग्रहांच्या संक्रमणाने तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. करिअरमध्ये चांगले बदल दिसतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

शनिची अनुकूल स्थिती आणि बुध ग्रहाच्या संक्रमणाने तुमचं नशीब पालटणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक यात्रेत सहभागी होऊ शकता. प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. तसेच, कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील प्रश्न सुटतील. 

‘या’ राशींना सावधानतेचा इशारा 

मिथुन रास (Gemini Horoscope)

ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा फटका मिथुन राशीच्या लोकांना बसणार आहे. या कालावधीत तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. तुमचा बजेट कोलमडू शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांपासून कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. 

मकर रास (Capricorn Horoscope)

जुलैच्या महिन्यात तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. या कालावधीत तुमच्या आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करा. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शनीची वक्री चाल तसेच, अन्य ग्रहांच्या प्रभावने तुमच्या प्रगतीत अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, या महिन्यात कुठेही पैशांची गुंतवणूक करु नका. अन्यथा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार कठीण असणार आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, तसेच, कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूरच राहाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Horoscope Today 1 July 2026 : आज बुधवारच्या दिवशी दिवशी 8 राशींची कठीण परीक्षा, ‘या’ 4 राशींवर गणरायाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *