आई तो मला मारुन टाकेल प्लीज काहीतरी…, ‘लव्ह जिहाद’ने घेतला फिजियोथेरेपिस्ट महिलेचा बळी, लेकीच्या रहस्यमय मृत्यूनंतर आईचा आक्रोश – Marathi News | Karnataka Crime female physiotherapist death due to Love Jihad Mother serious allegations on daughter mysterious death


Karnataka: कर्नाटक येथे एका फिजियोथेरेपिस्ट महिलेचा अत्यंत रहस्यमयरित्या मृत्यू झालेला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु असतानाच, पीडित महिलेच्या आईचा आक्रोश पाहायला मिळाला. एवढंच नाही तर, पीडित महिलेच्या आईने गंभीर आरोप केलं आहे. माझ्या लेकीचं निधन फक्त एक मृत्यू नाही तर, ‘लव्ह जिहाद’ प्रकरण आहे… पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, ‘सुरभि हिचा बॉयफ्रेंड मोहम्मद संजीत अली गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता आणि याचा परिणाम माझ्या मुलीवर झालेला. ती सतत घाबरलेल्या अवस्थेत असायची.’, दरम्यान, आईच्या दाव्यामुळे प्रकरणाला नवीन दिशा मिळाली आहे.

पीडितेच्या आईने असं देखील सांगितलं आहे की, ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रकरणं असेच चालत राहणार आहेत का? त्याने सुरभिचा शोध घेतला आणि तिला मारून टाकलं. सुरभि मला कायम म्हणायची, ‘आई… मला तो मारून टाकेल… प्लीज माझं लग्न लांब कुठेतरी करुन दे.. म्हणजे मी त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करु शकेल.. पण त्याने कधीच सुरभिला एकटं सोडलं नाही… ‘

आरोपी हा एक कुख्यात गुन्हेगार

या प्रकरणाने राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं असून, तेजस गौडांसारख्या हिंदुत्ववादी नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शविला आहे. संबंधित महिलेने असाही दावा केला की, तिच्या मुलीला आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं, जिथे तिला मदतीसाठी कोणीही येऊ शकत नव्हते. तसेच, आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचंही पीडितेच्या आईने सांगितलं आहे.

बेशुद्ध अवस्थेत होता बॉयफ्रेंड

संबंधित प्रकरण 26 वर्षीय फिजिओथेरपिस्ट साई सुरभि हिच्या मृत्यूशी संबंधित आहे; कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहल्ली येथील एका होमस्टेच्या खोलीत ती संशयास्पद परिस्थितीत मृत अवस्थेत आढळली होती. तर तिचा बॉयफ्रेंड, मोहम्मद संजित अली, घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तीन दिवस आधी हॉटेलमध्ये गेलेले दोघं

पोलिसांच्या माहितीनुसार, कपलने त्या होमस्टेमध्ये चेक इन केलं होतं आणि घटनेपूर्वी सुमारे तीन दिवस तिथे राहत होते. तपासकर्त्यांना खोलीत एक दोरी, काही गोळ्या, उलट्यांचे अंश आणि एक उशी सापडली. सुरभीच्या शरीरावर बाह्य जखमा आढळून आल्या नाहीत. पोलिस हत्या, आत्महत्या, विषबाधा किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा कट यांसारख्या विविध शक्यतांचा तपास करत आहेत. पण मृत्यूचं नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे याप्रकरणात पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *