Tridha Chaudhary and Bobby deol Intimate scenes: त्रिधा चौधरी (Tridha Chaudhary) या अभिनेत्रीने भोजपूरीसह हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा डंका गाजवला. तिनं आपल्या कारकिर्दीत तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये काम केलंय. पण तिला खरी ओळख प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ (Ashram) या वेब सिरीजमधून मिळाली. ‘आश्रम’ या वेब सिरीजमध्ये तिनं ‘बबीता भाभी’ (Ashram intimate scenes) ही भूमिका साकारली होती. या वेब सिरीजमध्ये बॉबी देओल आणि त्रिधा यांचे अनेक इंटिमेट सीन्स आहेत. या वेब सिरीजमुळे त्रिधा प्रचंड चर्चेत आली होती. पण हेच तिच्या ब्रेकअपचं कारणं बनलं. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने वेब सिरीजमधील इंटिमेट सीन आणि ब्रेकअपवर भाष्य केलं आहे.
अलिकडेच त्रिधाने Alphatalks Podcastला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने ‘आश्रम’ या वेब सिरीजवर भाष्य केलं. ‘जेव्हा मी आश्रम ही वेब सिरीज करत होते. तेव्हा माझा बॉयफ्रेंड प्रकाश झा यांना जाऊन भेटला. तसेच त्यांना अनेक सीन्स बदलण्यास सांगितले. त्याने तेव्हा सरांना सांगितले की, मी या मुलीशी लग्न करणार आहे. अशा प्रकारचे सीन्स ठेवू नका, असं म्हणत त्याने मेकर्सकडे विनंती केली’, असं त्रिधा म्हणाली.
या वेब सिरीजमध्ये जास्त बोल्ड सीन्स नव्हते, जितकी या गोष्टीची चर्चा झाली, असं अभिनेत्री म्हणाली.’सिरीज रिलीज झाल्यानंतर आमचा ब्रेकअप झालं होतं. असो.. आयुष्य कुणासाठीही थांबत नाही. फक्त मला एकाच गोष्टीची खंत आहे की, माझ्या डार्क फेजमध्ये तो माझ्यासोबत नव्हता’. त्रिधाने सांगितलं की, इंटिमेट सीन्स रोलच्या गरजेनुसार केली जातात. त्याचा वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नसतो, असंही अभिनेत्री म्हणाली.
इंटिमेट सीन्स नेमके कसे शूट होतात? (Tridha Chaudhary and Bobby deol intimated scenes)
एका दुसऱ्या पॉडकास्टमध्ये त्रिधाने बॉबीसोबतच्या इंटिमेट सीन्सवर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीला, ‘इंटिमेट सीन शूट करताना किती लोक उपस्थित असतात?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री सुरुवातीला हसली, म्हणाली, ‘तुम्ही स्क्रिनवर एकमेकांना मिठी मारताना, किस करताना आपण पाहिलं असेल. पण पडद्यामागची गोष्ट ही वेगळी असते. मी पडद्यामागे खूप मजा-मस्ती करते’, असं अभिनेत्रीनं सांगितलं. ‘आताचा काळ बदलत चालला आहे. अभिनेत्री म्हणून मला प्रोजेक्टच्या संबंधित कलाकार आणि दिग्दर्शकाशी चर्चा करण्याचा हक्क आहे’, असंही अभिनेत्री म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
विठाबाईंना मिळाली होती सिनेमात काम करण्याची संधी? राज कपूर यांची ऑफर नाकारली? कारण काय?
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा