Sunil Shinde Shivsena News: आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशानंतर आता आणखी एक विधान परिषद आमदार गळाला लावण्याची शिंदे शिवसेनेची तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरेंच्या उर्वरित विधानपरिषदेतील पाच आमदारांपैकी सुनील शिंदे (Sunil Shinde) हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे सुनील शिंदे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न शिंदे शिवसेनेकडून केला जात असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
सचिन अहिर हे 2022 मध्ये विधान परिषदेवर आले. ज्यावेळी दोन्ही शिवसेना गट हे एकत्रित होते. त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले. त्यामुळे कायदेशीर कारवाई त्यांच्या पक्षप्रवेशावर करण्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून अडचणी निर्माण होत आहेत. सुनील शिंदे हे 2021 मध्ये विधान परिषद आमदार झाले. यावेळी सुद्धा दोन्ही शिवसेना एकत्र होत्या. सुनील शिंदे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे सुनील शिंदे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न शिंदे शिवसेनेकडून केला जात असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक डॅमेज करण्याचा प्रयत्न- (Sunil Shinde Shivsena News)
सचिन अहिर धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, अगदी त्याचप्रमाणे सुनील शिंदेसुद्धा धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले ठाकरेंच्या शिवसेनेतील पाच आमदारांपैकी विधान परिषदेचे शेवटचे आमदार असतील. सुनील शिंदे यांची विधान परिषदेची टर्म ही 2027 मध्ये पूर्ण होणार आहे. या सगळ्याचा विचार करता सुनील शिंदे यांना आपल्यासोबत घेण्याचा विचार शिंदे शिवसेनेकडून केला जात आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक डॅमेज करण्याचा प्रयत्न शिंदे शिवसेनेचा आहे. सचिन अहिर यांनी काल शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि आता विधानपरिषद उपसभापती पद सचिन अहिर यांना मिळणार आहे.
आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवं- सुनील शिंदे (Sunil Shinde Shivsena News)
सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंचे विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवं होतं. कारण सचिन अहिर यांचं ज्या पद्धतीने चाललं होतं, त्याबाबत मला कल्पना आली होती. परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे यावर भाष्य करु शकत नव्हतो, अशी प्रतिक्रिया सुनील शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती.
ठाकरे गटाचे विधानपरिषदेतले आमदारांची यादी- (Shivsena UBT Vidhan Parishad MLA List)
- सुनिल शिंदे
- ज.मो.अभ्यंकर
- अंबादास दानवे
- मिलिंद नार्वेकर
- अनिल परब
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह