Shani Sade Sati: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे न्यायाचे आणि कर्मफळ देणारे देव मानले जातात. व्यक्तीने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांनुसार ते फळ देतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रात शनि ग्रह हा संयम, शिस्त, मेहनत, जबाबदारी, न्याय, विलंब, संघर्ष आणि दीर्घकालीन यशाचा कारक मानला जातो. असे मानले जाते, जेव्हा व्यक्तीची पत्रिकेत शनि अशुभ अवस्थेत असतो, तेव्हा शनिचा प्रकोप सुरू होतो. आणि मग साडेसाती, ढैय्या असा अत्यंत कठीण काळ सुरू होतो. ज्योतिषींच्या मते, काही राशी अशा आहेत. ज्यांच्यावर सध्या साडेसाती सुरू आहे, आणि यापुढे त्यांना आणखीनच सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण जुलै महिन्यात शनि वक्री होतोय. जाणून घ्या कोणत्या राशींना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
साडेसातीचे तीन टप्पे (Shani Sade Sati)
पहिला टप्पा – जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्च वाढणे, घरगुती बदल किंवा मानसिक ताण जाणवू शकतो.
दुसरा टप्पा – हा तुलनेने अधिक प्रभावी मानला जातो. करिअर, आर्थिक व्यवहार, आरोग्य आणि नातेसंबंध यांमध्ये संयम व सावधगिरीची गरज असते.
तिसरा टप्पा – संघर्ष कमी होत जातात. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होते आणि जीवनात स्थैर्य येण्याची शक्यता वाढते.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि 27 जुलै 2026 रोजी मीन राशीत वक्री होईल. ही वक्री गती 11 डिसेंबर 2026 पर्यंत चालेल. ज्योतिषीय गणनेनुसार, 3 राशीच्या लोकांना या काळात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशी साडेसातीच्या पहिल्या टप्प्यातून जात आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे आणि तणाव वाढू शकतो. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो.
कुंभ (Aquarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशी साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. घाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात. या काळात मोठी गुंतवणूक आणि जोखमीचे निर्णय टाळण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशी साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातून जात आहे, जो सर्वात आव्हानात्मक मानला जातो. दीर्घकाळ चाललेल्या कामात अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागू शकतो. मानसिक ताणही वाढू शकतो. चित्र: फ्रीपिक
शनिला प्रसन्न करण्याचे उपाय…
- प्रत्येक शनिवारी, ‘ओम शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा तीन वेळा जप करा
- पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, सात प्रदक्षिणा घाला.
- शनीच्या वक्री भ्रमणामुळे काही राशींना आव्हाने येऊ शकतात,
- परंतु संयम, शिस्त आणि योग्य उपाययोजनांनी अडचणी मोठ्या प्रमाणात कमी केल्या जाऊ शकतात.
हेही वाचा :
July 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जुलै महिन्यात मोठा यू-टर्न, 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात…