Nagpur Congress : संघाच्या (RSS) कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्या पोलिसिंग बद्दल संशय व्यक्त करणाऱ्या काँग्रेस (Congress) आणि इतर काही संघटनांनी त्यांना संविधानाची (Constitution) प्रत भेट म्हणून दिली आहे. यावेळी नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून संविधानांप्रमाणेच कार्य करण्याचा सल्ला देखील यावेळी त्यांना देण्यात आला आहे. काँग्रेससह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, जय विदर्भ पार्टी अशा विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) माझा एन्काऊंटर करतील, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या नागपूर काँग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील (Praful Gudadhe Patil) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने विश्वास नांगरे पाटील यांची पोलीस भवन येथे भेट घेतली. (Praful Gudadhe on Vishwas Nangre Patil)
Praful Gudadhe on Vishwas Nangre Patil: “संघ समजून घ्यायचा असेल तर त्यांनी आमची मदत घ्यावी”
“आम्ही नागपूरचे आहोत, म्हणून तुमच्या तुलनेत संघाला आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने आणि जवळून ओळखतो. त्यामुळे नांगरे पाटील यांना संघ समजून घ्यायचा असेल तर त्यांनी आमची मदत घ्यावी” असा सल्ला ही काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. विश्वास नांगरे पाटील सर्वांना परिचित असलेले व्यक्ती आहेत, तरुणाईमध्ये त्यांचे विशेष आकर्षण आहे, आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ त्यांच्या याच प्रसिद्धीचा फायदा उचलू पाहत आहे, असा आरोपही यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
Vishwas Nangare Patil: कार्यक्रमात जाऊन कुठेही मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तीचे उल्लंघन केलेले नाही,
दरम्यान, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात उपस्थित राहून केलेल्या भाषणानंतर सोशल मीडियातून त्यांना लक्ष्य करण्यात आलं. विश्वास नांगरे पाटील यांची अलीकडेच नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांनी नागपूरचा (Nagpur) पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच, संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन होत असलेल्या राजकीय टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. त्या (संघाच्या) कार्यक्रमात जाऊन कुठेही मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तीचे उल्लंघन केलेले नाही, असेही नांगरे पाटील (Vishwas nangare) यांनी म्हटले होते. त्यानंतर आता नागपूर काँग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने विश्वास नांगरे पाटील यांची पोलीस भवन येथे भेट घेत त्यांना संविधानाची प्रत भेट म्हणून दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह