800 किलोच्या सांडाने थांबवली क्रिकेटची मॅच, जीव वाचवण्यासाठी खेळाडू-अंपायरची धावपळ, Video | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

क्रिकेटचा सामना अनेकदा पाऊस आणि खराब सूर्यप्रकाशामुळे थांबवल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. काही वेळा मधमाशा, श्वान किंवा साप मैदानात आल्यामुळेही क्रिकेटचा सामना थांबवला गेला.

800 किलोच्या सांडाने थांबवली क्रिकेटची मॅच, जीव वाचवण्यासाठी खेळाडू-अंपायरची धावपळ, Video
800 किलोच्या सांडाने थांबवली क्रिकेटची मॅच, जीव वाचवण्यासाठी खेळाडू-अंपायरची धावपळ, Video

मुंबई : क्रिकेटचा सामना अनेकदा पाऊस आणि खराब सूर्यप्रकाशामुळे थांबवल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. काही वेळा मधमाशा, श्वान किंवा साप मैदानात आल्यामुळेही क्रिकेटचा सामना थांबवला गेला, पण 800 किलोचा सांड क्रिकेटच्या मैदानात आल्यामुळे सामना थांबवला गेल्याची विचित्र घटना घडली आहे. इंग्लंडच्या नॉर्थ इस्ट प्रीमियर लीगच्या मॅचमध्ये हा प्रकार घडला आहे.

बर्नोपफील्ड क्रिकेट क्लब आणि हेटन लायन्स यांच्यातला लीग स्टेजचा सामना सांड मैदानात आल्यामुळे रद्द करावा लागला आहे. हा सांड क्रिकेटच्या मैदानात घुसून पळत होता, सुरूवातीला हा प्रकार मजेशीर वाटला पण सांड जसा खेळाडू, अंपायर आणि प्रेक्षकांच्या मागे लागला, तसे ते जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागले. सांडाचं लक्ष विचलित करण्यासाठी मैदानात गायही आणण्यात आली, पण हा प्रयोगही यशस्वी ठरला नाही.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हा सांड जवळच्या शेतातून जवळपास 1.6 किमीचा प्रवास करून क्रिकेटच्या मैदानात आला. स्थानिक शेतकरी आणि सांडाच्या मालकाने त्याला मैदानाबाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न केले, पण कुणालाच यात यश आलं नाही. ‘सुरूवातीला हा प्रकार मजेशीर वाटला, पण मॅच रद्द करण्यापर्यंत वेळ येईल हे आम्हाला वाटलं नव्हतं. आम्हाला त्याला बाहेर काढता आलं नाही, वेळेआधी आम्ही खेळही सुरू करू शकलो नाही’, असं बर्नोपफील्ड क्लबचे प्रमुख मार्टिन ऑस्वेल म्हणाले.

सांडाने शेतकऱ्याला दिली टक्कर

सांडाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला टक्कर दिली. सुदैवाने शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली नाही. सांडाला मैदानातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनाही बोलावलं गेलं, पण त्याआधी सांड निघून गेला होता. पण मॅचची वेळ संपल्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय अंपायरनी घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *