Last Updated:
माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी इथं गोळीबाराची संध्याकाळच्या सुमारास घटना घडली. उषा साठे असे मृत महिलेचे नाव आहे.
पंढरपूर : पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माळशिरस तालुक्यात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने या महिलेवर गोळीबार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी इथं गोळीबाराची संध्याकाळच्या सुमारास घटना घडली. उषा साठे असे मृत महिलेचे नाव आहे. तर सचिन देशमुख असं गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचं नाव आहे. उषा साठे यांच्यावर शेतामध्ये सचिन देशमुख याने आपल्या रिव्हाल्व्हरमधून उषा साठे यांच्यावर गोळी झाडली. या गोळीबारामध्ये साठे यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर देशमुख हा घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसाांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनास्थळाचा पंचनामा करून उषा साठे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गोळीबारानंतर देशमुख फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध कार्य सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास माळशिरस पोलीस करत आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
Pandharpur,Solapur,Maharashtra
Jul 06, 2026 11:49 PM IST
