1,69,00,00,000… देशातला सगळ्यात मोठा FD घोटाळा, रिटायरमेंटच्या दिवशीच बडा IAS अधिकारी अटकेत! | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

169 कोटी रुपयांच्या एफडी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने तिसऱ्या आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. हा पूर्ण बँक घोटाळा एका सरकारी विभागाला झालेलं सगळ्यात मोठं आर्थिक नुकसान असल्याचं सांगण्यात येत आहे.

1,69,00,00,000... देशातला सगळ्यात मोठा FD घोटाळा, रिटायरमेंटच्या दिवशीच बडा IAS अधिकारी अटकेत!
1,69,00,00,000… देशातला सगळ्यात मोठा FD घोटाळा, रिटायरमेंटच्या दिवशीच बडा IAS अधिकारी अटकेत!

मुंबई : 169 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने तिसऱ्या आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. प्रदीप कुमार असं या आयएएस अधिकाऱ्याचं नाव आहे. या घोटाळ्याची प्रदीप कुमार यांना पूर्ण कल्पना होती आणि घोटाळ्यामध्ये त्यांची थेट भूमिका होती, असं तपासात समोर आल्याचं सीबीआयने सांगितलं आहे. प्रदीप कुमार हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड (HSPCB) चे तत्कालिन सदस्य सचिव होते.

काय आहे FD घोटाळा?

सीबीआयच्या तपासानुसार बोर्डाच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या नावावर निश्चित रकमेपेक्षा जास्त रक्कम चंडीगढच्या सेक्टर-32 मधील आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये पाठवण्यात आली. तसंच बँकेत ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले, ते खातं उघडण्यासाठी कोणतीही अधिकृत मंजुरी किंवा रेकॉर्ड विभागाकडे सापडलेलं नाही. एफडी बनवण्याऐवजी त्या खात्यातून फर्जी पद्धतीने पैसे काढले गेले, ज्यामुळे हरियाणा सरकारचं 169 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. हा पूर्ण बँक घोटाळा एका सरकारी विभागाला झालेलं सगळ्यात मोठं आर्थिक नुकसान असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रदीप कुमार बऱ्याच काळापासून तपासात सहकार्य करत नव्हते. वारंवार तपासासाठी बोलावलं तरी ते आले नाहीत, त्यामुळे अखेर त्यांचं लोकेशन शोधून काढून त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. हे प्रकरण हरियाणा सरकारच्या सांगण्यानुसार सीबीआयकडे सोपवलं गेलं. हा घोटाळा फक्त HSPCB पर्यंतच मर्यादित नाही, तर सेक्टर-32 मधल्या आयडीएफसी फर्स्ट बँकेशी निगडित या घोटाळ्यात हरियाणा सरकारच्या 8 विभागांचे जवळपास 504 कोटी रुपये बोगस एफडी आणि बोगस बँक ट्रॅन्झॅक्शनच्या माध्यमातून काढून शेल कंपन्यांमध्ये पाठवले गेले, असंही तपासात समोर आलं आहे.

तिसरा IAS अधिकारी अटकेत

आतापर्यंत सीबीआयने याप्रकरणी 17 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. यात बँक अधिकारी, सरकारी कर्मचारी, प्रायव्हेट कंपनी आणि इतर आरोपींचा समावेश आहे. प्रदीप कुमार यांच्या अटकेआधीही सीबीआयने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. प्रदीप कुमार यांचा या घोटाळ्यामध्ये थेट संबंध आहे, ते स्वत: गुंतवणुकीचं सगळं काम पाहत होते, असं तपासात समोर आल्याचं सीबीआयने सांगितलं आहे.

फिक्स्ड डिपॉझिटसाठी निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा बरीच मोठी रक्कम आयडीएफसी फर्स्ट बँकेत पाठवली गेली. HSPCB ची ही रक्कम पहिले आयडीएफसी फर्स्ट बँक सेक्टर-32, चंडीगढमध्ये उघडण्यात आलेल्या एका खात्यात ट्रान्सफर केली गेली. धक्कादायक बाब म्हणजे असं खातं उघडल्याची कोणतीही माहिती किंवा कागदपत्र विभागाकडे नाही.

रिटायरमेंटच्या एक दिवस आधीच अटक

हरियाणा सरकारला या घोटाळ्यामुळे जवळपास 169 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. सीबीआयने या प्रकरणात आधीच दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. प्रदीप कुमारना त्यांच्या निवृत्तीच्या एक दिवस आधीच अटक केली गेली आहे.

मराठी बातम्या/देश/

1,69,00,00,000… देशातला सगळ्यात मोठा FD घोटाळा, रिटायरमेंटच्या दिवशीच बडा IAS अधिकारी अटकेत!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *