ENG vs IND : टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या आव्हानासाठी सज्ज, पहिला सामना किती वाजता? – Marathi News | Eng vs ind t20i series England vs india 1st match live and digital streaming venue and time know all details


श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात अपयशी ठरली. यजमान आयर्लंडने टीम इंडियाला 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका आणि 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही टी 20i मालिकेने होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना जिंकून मालिकेत विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. सलग 2 सामने आणि मालिका गमावल्याने भारतावर कुठेतरी दडपण असणार आहे. त्यामुळे श्रेयससेना इंग्लंड दौऱ्याची कशी सुरुवात करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील पहिला टी 20i सामना कुठे पाहता येईल? हे सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20i सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20i सामना बुधवारी 1 जुलैला खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20i सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20i सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल इथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिल्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिल्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरुवात होणार आहे. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्स लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20i सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची प्रतिक्षा संपणार?

दरम्यान भारतीय चाहत्यांचं पहिल्याच सामन्यात 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या पदार्पणाकडे लक्ष असणार आहे. वैभवची आयर्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतही निवड करण्यात आली होती. मात्र वैभवला आयर्लंड विरूद्धच्या दोन्ही सामन्यात संधी दिली नाही. त्यामुळे वैभवला 5 पैकी एका सामन्यात तरी संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *