Gold Price Today : सोन्याचे भाव धाडकन घसरले, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट दोन्ही झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर – Marathi News | Gold silver price today 12 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai chennai


12 जूनला 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनं किती झालं स्वस्त ?

बहुतांश लोकांना सोन्या-चांदीचे दागिन घालायला आवडतात, मात्र गेल्या काही काळात सोन्या-चांदीचे भाव एवढे वर चढले होते, की खरेदी करण्याच्या विचारानेही ग्राहकांना धडकी भरायची. मात्र आता गेल्या काही दिवसांत सोन्याचे आणि चांदीचे दर खाली आले असून शुक्रवार, 12 जून रोजी देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. देशांतर्गत सोन्याचे भाव कमी झाले आहेत. 12 जूनच्या सकाळी, बहुतांश शहरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख, 45 हजार 780 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9% शुद्ध सोन्याच्या दरात 2100 रुपयांची घट होऊन तो प्रति 10 ग्रॅम 1,53,900 रुपयांवर स्थिरावला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा (तात्काळ व्यवहारासाठीचे सोने) व्यापार प्रति औंस 4072.21 डॉलर्सवर सुरू आहे.

इतके दिवस वर चढणारं सोनं आता स्वस्त होण्याची अनेक कारणं आहेत. महागाईबाबतची सततची चिंता, व्याजदर कपातीबाबत बदलत्या अपेक्षा आणि अमेरिकन डॉलर व बाँड यील्डमधील (रोख्यांवरील परतावा) वाढ यांसारख्या अनेक कारणांमुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, दिवसाच्या उत्तरार्धात सोन्याचे दर वधारण्याची शक्यता आहे; कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धचे नियोजित लष्करी हल्ले रद्द केल्याचे जाहीर केलंय. इराणसोबतची चर्चा इराणी नेतृत्वाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचली असून कराराच्या मुख्य आराखड्याला सर्व संबंधित पक्षांनी मंजुरी दिली आहे, असा ट्रम्प यांचा दावा आहे. यामुळे पश्चिम आशियात 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू असलेल्या युद्धाचा अंत होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं हे 1,45,780 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं हे 1,33,640 रुपयांना मिळतंय. तर आर्थिक राजधानी मुंबई तसेच कोलकाता येते 22 कॅरेट सोनं 1,33,490 रुपये प्रति 10 ग्रॅम, आणि 24 कॅरेट सोनं 1,45,630 रुपयांना विकल जात आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,47,270 रुपये आणि 22 कॅरेटचा भाव 1,34,990 रुपये इतका आहे. पुणे व बंगळुरूमध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोन 1,45,630 रुपयांना आणि 22 कॅरेट सोनं हे 1,33,490 रुपये इतकं आहे.

चांदीचे दर

शुक्रवारी सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही आणखी घसरण झाली आहे. 12 जूनच्या सकाळपर्यंतचा चांदीचा दर प्रति किलो 2,49,900 रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट सिल्व्हर’चा (तात्काळ व्यवहारासाठीची चांदी) व्यापार प्रति औंस 63.18डॉलर्स या दराने होत आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत दर हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *