सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच


पुणे : जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल (pune) खून प्रकरणाती धक्कादायक बाब पुढे आल्यानंतर याप्रकरणी अनेक नवे खुलासे, फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. 19 जून रोजी केतनची होणारी पत्नी सिया गोयलचा वाढदिवस होता. हाच वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी, म्हणजेच 18 जूनला हे जोडपे लोहगड (crime news) किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. पण त्याच दिवशी संध्याकाळी केतनचा फोटो काढताना पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आली. मात्र, हा पूर्वनियोजित कट असल्याची बाब समोर आली. भावी पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केतनचा काटा काढल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला. मात्र, केतनसोबत (ketan) आपलं नातं किती जिव्हाळ्याचं होतं, हे आरोपी सियाकडून सातत्याने दाखवलं जात होतं, आता याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. 

लोहगडावरुन पडून मृत्यू झालेल्या केतनची दुर्घटना हा सुरुवातीला दुर्दैवी अपघात वाटत होता, मात्र, अवघ्या 5 दिवसांत पोलिसांनी या मृत्यूमागील भयंकर गुपित उघड केले, त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. केतनचा मृत्यू अपघात नव्हता, तर त्याचा पूर्वनियोजित खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा कट रचणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची होणारी पत्नी ‘सिया गोयल’ हीच निघाली, जिच्यासोबत केतन ट्रेकिंगला लोहगडावर गेला होता. 

परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून नुकताच वडिलांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात स्थिरावलेला 24 वर्षांचा तरुण उद्योजक केतन अग्रवाल. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या त्याच्या शाही विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. राजस्थानमधील जयपूर येथे एका भव्य पॅलेसमध्ये तब्बल 17 कोटी रुपये खर्चून विवाहसोहळ्यासाठी एक पॅलेस देखील बुक केला होता. व्हीआयपी पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन खासगी विमानेही बुक झाली होती. संपूर्ण अग्रवाल कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, एका विदारक घटनेने या आनंदाचे रूपांतर कधीही न भरून निघणाऱ्या दुःखात केले. आता, या हत्येच्या घटनेमागील एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत.

सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा व्हिडिओ समोर

सियाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे याप्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. केतनच्या मृत्यूच्या बरोबर एक महिना आधी, म्हणजेच 18 मे रोजी सियाने इन्स्टाग्रामवर एक बर्थडे काउंटडाउन स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये केतनने तिला खुश करण्यासाठी केलेले खास प्रयत्न आणि दोघांमधील अथांग प्रेम दिसत होते. बाहेरील जगाला त्यांचे नाते आदर्श वाटत असतानाच पडद्यामागे मात्र एका निष्पाप जिवाचा बळी घेण्याचा भयानक कट शिजत होता, ज्यामुळे सध्या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

हेही वाचा

सिया गोयलच्या बॉयफ्रेंडची भर उन्हातली एक चूक अन् पोलखोल…, पोलिसांनी कसं उलगडलं केतन अग्रवालच्या मृत्यूचं कोडं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *