सणासुदीत आनंदाची बातमी, खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्राची मोठी कपात – Marathi News | Festive season brings good news: Centre cuts import duty on edible oil.


सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारने कच्च्या आणि शुद्ध (रिफाईंड) खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या आणि शुद्ध (रिफाइंड) खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार, कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील सीमा शुल्क १०% वरून ५% आणि रिफाइंड सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क ३२.५% वरून २७.५% करण्यात आले आहे. याशिवाय कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क पूर्णपणे (०%) माफ करण्यात आले असून रिफाईंड सूर्यफूल तेलावरील शुल्क ३२.५% वरून थेट २२.५% वर आणले आहे. हे सर्व बदल २४ सप्टेंबर २०२६ पासून लागू होत आहेत.

सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क १०% वरून थेट शून्य

केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्कात मोठी कपात केली आहे. कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील आयात शुल्क १०% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आले आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क १०% वरून थेट शून्य टक्क्यांवर आणली आहे. रिफाईंड सोयाबीन आणि पामतेलावर २७.५% तर रिफाईंड सूर्यफूल तेलावर २२.५% आयात शुल्क लागू होईल.सीमा शुल्कातील हे नवे दर २४ सप्टेंबर २०२६ पासून देशभरात लागू होणार आहेत.

एएनआयच्या बातमीनुसार, अर्थ मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यात ही शुल्क कपात २४ सप्टेंबरपासून लागू होईल असे म्हटले आहे. कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे तेलावरील शुल्क १०% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आले आहे, तर रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड पाम तेलावरील शुल्क ३२.५% वरून २७.५% पर्यंत कमी केले आहे.

ग्राहकांसाठी तेलाचे दर असे कमी होणार

तसेच, केंद्र सरकारने कच्च्या सूर्यफूल तेलावरील शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे.  ते १०% वरून शून्य ( nil )  केले आहे. रिफाईंड सूर्यफूल तेलावरील शुल्क ३२.५% वरून २२.५% पर्यंत कमी झाले आहे. या शुल्क कपातीने खाद्यतेलाच्या आयातीचा खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. पुरवठा साखळीद्वारे या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवला जातो, यावर ग्राहकांसाठी तेलाचे दर कमी होऊ शकतात की नाही हे कळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *