Upcoming OTT Release: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येणार आहे. Netflix, Prime Video, Jio Hotstar आणि ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तब्बल 9 चित्रपट आणि वेबसिरीज रिलीज होणार आहेत. त्यामुळे घरबसल्या काहीतरी नवीन पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर या रिलीजच्या तारखा नक्की लक्षात ठेवा. या आठवड्यात कोर्टरूम थ्रिलरपासून हॉरर, रोमँटिक कॉमेडी, रिॲलिटी शो आणि क्राइम-ड्रामापर्यंत बरंच काही पाहायला मिळणार आहे.
हुंकार (Hunkkaar: The Roar)
‘सैयारा’मधील कामानंतर अनीत पड्डा आता एका डार्क आणि इंटेन्स भूमिकेत दिसणार आहे. प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स, अप्लॉज एंटरटेनमेंट आणि बिर्ला स्टुडिओज यांच्या निर्मितीत ही सोशल-कोर्टरूम थ्रिलर तयार करण्यात आली आहे. अनीत पड्डाने मीनू रावतची भूमिका साकारली आहे. मीनू ही 17 वर्षांची मुलगी असून तिने प्रसिद्ध धर्मगुरू सुनील चाकोसीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या अनुयायांकडून त्यांना ‘बापजी’ म्हणून पूजलं जातं. श्रद्धा, निष्ठा आणि भीतीच्या वातावरणात घडणारी ही कथा प्रेक्षकांसमोर अनेक प्रश्न उभे करणार आहे. या वेबसिरीजमध्ये अनीत पड्डासोबत फातिमा सना शेख, मोहम्मद जीशान अय्यूब आणि अर्जुन माथुर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘हुंकार’ 25 सप्टेंबरला Jio Hotstar वर रिलीज होणार आहे.

शक (Shaque)
परिणीती चोप्रा आता मिस्ट्री-सीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर एन्ट्री करत आहे. या सीरीजमध्ये ती एका आईची भूमिका साकारत आहे. तिचं नवजात बाळ तब्बल 9 वर्षांपूर्वी हॉस्पिटलमधून गायब होतं. मुलीच्या बेपत्ता होण्याचा तपास सुरू झाल्यानंतर तिचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीचे लोक संशयाच्या भोवऱ्यात सापडतात. तिच्या जवळच्या व्यक्तीलाच या घटनेबाबत तिच्यापेक्षा जास्त माहिती होती का, असा प्रश्न या तपासातून निर्माण होतो.परिणीती चोप्रासोबत जेनिफर विंगेट, ताहिर राज भसीन, सोनी राजदान, सुमीत व्यास, अनूप सोनी आणि हरलीन सेठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरीज 24 सप्टेंबरला Netflix वर रिलीज होणार आहे.

डोन्ट बी शाय (Don’t Be Shy)
आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्या इटरनल सनशाइन प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेली ही कमिंग-ऑफ-एज रोमँटिक कॉमेडी आहे.मैत्री, आकर्षण, मत्सर आणि अडल्टहुड अशा अनेक गोष्टींचं मिश्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आरुषी बजाज, अंश दुग्गल, बियांस अरोरा आणि पीयूष खाती हे चार नवे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.’डोन्ट बी शाय’ 25 सप्टेंबरला Prime Video वर रिलीज होणार आहे.

राइज अँड फॉल सीजन 2 (Rise And Fall Season 2)
रिॲलिटी शो ‘राइज अँड फॉल’चा दुसरा सीजनही या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग या सीझनचं होस्टिंग करणार आहे. या शोमध्ये 15 स्पर्धक सहभागी होणार असून, शोच्या फॉरमॅटनुसार सत्तेचं समीकरण कधीही बदलू शकतं. ‘राइज अँड फॉल सीझन 2’ 26 सप्टेंबरपासून Jio Hotstar वर स्ट्रीम होणार आहे.

टॉक्सिक (Toxic: A Fairy Tale For Grown Ups)
यश, नयनतारा, कियारा आडवाणी, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘टॉक्सिक’ आता ओटीटीवर येणार आहे. 26 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘टॉक्सिक’ 25 सप्टेंबरला ZEE5 वर रिलीज होणार आहे.

ब्लड लेगेसी सीजन 2 (Blood Legacy Season 2)
दक्षिण आफ्रिकन ड्रामा सीरीज ‘ब्लड लेगेसी’चा दुसरा सीजनही रिलीज होणार आहे. या सीजनमध्ये Ndlovu कुटुंबाचं साम्राज्य घराच्या आत आणि बाहेरूनही ढासळताना दिसणार आहे. पहिल्या सीजनच्या शेवटी खानीवर वडिलांच्या हत्येचा खोटा आरोप करण्यात आला होता. त्याचवेळी एका भ्रष्ट नेत्याने तिचं अपहरण केलं होतं. दुसऱ्या सीजनमध्ये ती स्वतःचं नाव या आरोपातून साफ करण्यासोबतच आपली गमावलेली ओळख आणि वारसा परत मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसेल. दरम्यान, कुटुंबाचा व्यवसायही संकटात सापडतो. ही सीरीज 24 सप्टेंबरला Netflix वर रिलीज होणार आहे.

बकैती सीजन 2 (Bakaiti Season 2)
ZEE5 ची ‘बकैती’ वेबसिरीज दुसऱ्या सीजनसह परतत आहे. गाझियाबादमधील कटारिया कुटीरमध्ये राहणाऱ्या कटारिया कुटुंबाची कथा या सीजनमध्ये पुढे जाणार आहे.यावेळी दोन कुटुंबं एकाच छताखाली राहणार असल्यामुळे घरात रोज नवी धावपळ पाहायला मिळणार आहे.बाथरूमसाठीची रांग असो किंवा मिडल क्लास कुटुंबांमधील मजेदार वाद, या सीजनमध्येही विनोदी प्रसंगांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.’बकैती सीजन 2′ 25 सप्टेंबरला ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे.

हेबियस कॉर्पस (Habeas Corpus)
Netflix Brazil आता लीगल-ड्रामाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘इनोसन्स प्रोजेक्ट ब्राझील’च्या कामापासून प्रेरणा घेतलेली ही सीरीज चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांभोवती फिरते.या सीरीजमध्ये अशा प्रकरणांची चौकशी आणि त्यामागचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न पाहायला मिळणार आहे. ‘हेबियस कॉर्पस’ 23 सप्टेंबरला Netflix वर रिलीज होणार आहे.
अगाधा (Agadha)
आस्था आणि अलौकिक भीतीचा संघर्ष दाखवणारी ‘अगाधा’ ही सुपरनॅचरल मिस्ट्री थ्रिलर आहे. या कथेच्या केंद्रस्थानी महादेवी हे पात्र आहे. तिच्याकडे असलेल्या आध्यात्मिक शक्तीच तिच्या कुटुंबाला एका भयंकर संकटापासून वाचवण्याचा एकमेव मार्ग ठरतात. हे संकट एका प्रतिबंधित गुहेत आणि ‘अगाधा’ नावाच्या भयावह शक्तीशी जोडलेलं आहे. ही शक्ती तिच्या कुटुंबाच्या जवळ येऊ लागल्यानंतर महादेवीला त्या ठिकाणी जावं लागतं, जिथे जाण्यासाठी इतरांना मनाई करण्यात आली आहे. ‘अगाधा’ 25 सप्टेंबरला Jio Hotstar वर रिलीज होणार आहे.
