Hasan Mushrif: आमच्या पक्षातील जे मतभेद दिसतायत ते पुढील आठवड्यामध्ये आम्ही बसून ते सगळे संपवणार आहोत. एकसंधपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल फार महत्वपूर्ण ठरणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार वहिनींच्या नेतृत्वाखाली 42 च्या 42 आमदार आणि संपूर्ण राज्य आणि कार्यकर्ते हे त्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे ते म्हणाले.
संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर नाराजी
मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत ते म्हणाले की, शिरसाट शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. गेल्या मंगळवारी शिरसाटांबद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे स्पष्टपणाने नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळी आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात? येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
ते वक्तव्य कोणाला उद्देशून नाही
मुश्रीफ यांनी सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर खुलासा केला. ते म्हणाले की, तटकरे साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे की मी मागच्या दाराने आलो नाही’, ते कोणालाही उद्देशून केलेलं नाही. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पवार साहेबांनी मोदी साहेबांचं परराष्ट्रामध्ये जाणं आणि देशाची इभ्रत वाढण्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे, ते महत्वपूर्ण आहे. राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, परंतु त्यांनी बोलताना देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी शब्दात उल्लेख करणं किंवा अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे मला वाटते योग्य नाही, अस ते म्हणाले. पवार साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांना शाबासकी द्यावी, त्याची वाहवा करावी, मला वाटते हे पवार साहेबांनी उचललेलं स्वागतार्ह पाऊल असल्याचेही ते म्हणाले.
कर्जमाफीवर काय म्हणाले?
मुश्रीफ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांनी 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं जाहीर केलेलं आहे, 30 जूनपूर्वी कर्जमाफी होईल. 1 जून 2025 पूर्वी ज्याची थकबाकी असेल त्याला 2 लाखापर्यंतची थकबाकी (मिळेल), 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याने वरची रक्कम भरल्यानंतर 2 लाख रुपये त्याला मिळतील. 2022-23,23-24 आणि 24-25 या तीन वर्षांमध्ये दोन वर्षे नियमित कर्ज परतफेड केली त्याला 50 हजार रुपये अनुदान मिळेल.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा