‘शिव्या तर पडणार…’, India’s Got Latent Season 2 बद्दल समय रैनाचं मोठं सरप्राइज, VIDEO | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

India’s Got Latent Season 2: इंटरनेटवर खळबळ उडवून देणारा त्याचा अत्यंत लोकप्रिय शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ आता नव्या ढंगात आणि नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे.

News18
News18

मुंबई: सोशल मीडियावर आपल्या अतरंगी आणि भन्नाट कॉमेडीने तरुणाईला वेड लावणारा प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना सध्या एका मोठ्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. इंटरनेटवर खळबळ उडवून देणारा त्याचा अत्यंत लोकप्रिय शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ आता नव्या ढंगात आणि नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी समय केवळ यूट्यूबपुरता मर्यादित नसून, थेट नेटफ्लिक्सवर एन्ट्री मारत आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत घोषणेनंतर आता खुद्द समयने एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना एक नाही, तर दोन मोठे सरप्राइज दिले आहेत.

यूट्यूब आणि नेटफ्लिक्सवर एकाच वेळी होणार रिलीज

नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या शोचा एक मजेशीर टीझर रिलीज केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आता एका सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा करण्याची वेळ आली आहे… लवकरच नेटफ्लिक्सवर ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन २’!”

या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला होता की, हा शो पाहण्यासाठी नेटफ्लिक्सचे पैसे मोजावे लागणार का? यावर समय रैनाने स्वतः एक व्हिडिओ जारी करत चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याने स्पष्ट केले की, हा शो नेटफ्लिक्स आणि यूट्यूब या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच दिवशी आणि एकाच वेळी रिलीज केला जाईल. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, “जर दोन्हीकडे सारखाच कंटेट असेल, तर लोकांनी तो नेटफ्लिक्सवर का पाहावा?” त्यावर समयने आपल्या खास शैलीत उत्तर दिले, “कारण नेटफ्लिक्सवर यूट्यूबसारख्या नकोशा वाटणाऱ्या जाहिराती येणार नाहीत, लोकांना न थांबता शोचा आनंद घेता येईल!”

वादाच्या भोवऱ्यातून थेट नेटफ्लिक्सशी ‘डबल डील’

या शोचा इतिहास पाहिला तर तो जेवढा लोकप्रिय आहे, तितकाच तो वादाच्या भोवऱ्यातही राहिला आहे. जून २०२४ मध्ये या शोचा पहिला सीझन सुरू झाला होता. मात्र, शो दरम्यान रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि अपूर्वा मुखिजा यांच्या काही अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त कमेंट्समुळे मोठा गदारोळ झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांत एफआयआर देखील दाखल झाली होती, ज्यामुळे हा शो ऐन रंगात असताना बंद करावा लागला होता.

पण आता दोन वर्षांनंतर समय रैनाने आणखी एक मोठा धमाका केला आहे. त्याने हिंट दिली आहे की, त्याने नेटफ्लिक्ससोबत फक्त या एका शोसाठी नाही, तर डबल डील केली आहे. म्हणजेच ‘इंडियाज गॉट लेटेंट २’ च्या व्यतिरिक्त समयचा आणखी एक बडा प्रोजेक्ट लवकरच नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *