Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..


Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता निमिष कुलकर्णी (Nimish Kulkarni) कायमच त्याच्या कॉमेडीच्या टाइमिंगमुळे, उत्तम संवादफेक आणि स्पष्ट उच्चारांमुळे प्रेक्षकांची दाद मिळवतो. पण एखाद्याच प्रहसनात निमिश दिसतो, त्यामुळे नंतर काहीकाळ जर तो दिसला नाही की, निमिशने हास्यजत्रा सोडली का? असा अनेकांचा प्रश्न असतो. अलिकडेच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तो याविषयी बोललाय. हास्यजत्रेत वारंवार दिसत नसल्यामागचं कारण सांगत पूर्णवेळ हास्यजत्रेत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.

प्रोफेशनल आयुष्याची सुरुवातच हास्यजत्रेपासून..

महाराष्ट्राची हास्यजत्रा’या कार्यक्रमाविषयी बोलताना निमिश भरभरून बोलला. तो म्हणाला ‘ माझं प्रोफेशनल आयुष्यच मुळात हास्यजत्रेमुळं सुरू झालं. यात काहीच वाद नाही. 2019 मध्ये मी हास्यजत्रा करायला सुरुवात केली. आज 2026 आहे. अजूनही मी बाहेर फिरत असलो, बाहेरच्या राज्यातही लोक मला ओळखतात. हिमाचल प्रदेशमध्ये मला चार लोकांनी ओळखलं. एका ओडीसाच्या पाणीपुरीवाल्याने मला ओळखलं. एका नाटकासाठी मी यु एस दौरा केला ऑस्ट्रेलिया दौरा केला पण सगळीकडे मला ओळखतात हास्य जत्रेमुळे . हा शो सगळ्यात मोठा आहे. हे मी सांगायची गरज नाही, हे सगळ्यांनाच मान्य आहे. जगभरातले लोक हा शो पाहतात. आणि तुमच्या प्रहसनातील एका डायलॉगमुळे तुम्हाला ते ओळखतात. आणि मी खूप भाग्यवान आहे की, हास्यजत्रेमुळे माझ्या प्रोफेशनल आयुष्याची सुरुवात झाली.’ असं निमिष म्हणाला. 

हास्यजत्रेत वारंवार न दिसण्याचं सांगितलं कारण ..

थोडसं कधीतरी वाईट वाटतं, असं होतं की अनेकदा मला वाटतं की मी या शोचा पूर्ण वेळासाठी भाग का नाही? काही गोष्टी हव्या तशा घडल्या नाहीत. त्यामुळे मी या शोचा रेग्युलरली भाग नाही. पण, मी खूप खुश आहे की ते लोक मला त्याच आपुलकीने बोलवतात. सेटवरचा प्रत्येक जण मोटे सर आणि गोस्वामी सर या दोन व्यक्तींचं माझ्या आयुष्यातील योगदान मी कधीही विसरू शकत नाही.त्याबद्दल वेगळं सांगायला नको. आज मी जे काही काम करतो, ते त्या दोघांनी सांगितलेलं गोष्टीच मी माझ्या कामात पेरत असतो. या दोन माणसांनी मला घडवलंय. हास्य जत्रेच्या सेटवर मला जेव्हा कधी बोलवलं जातं, तेव्हा आपले पंचेस तीन चार महिन्यांनी आले आहेत असं मुळीच वाटत नाही. आपण रेग्युलरली हा शो करतोय असंच वाटतं. पण, बऱ्याचदा वाटतं की आपण हा शो जर रोज करत असलो असतो तर खूप शिकायला मिळालं असतं. पण काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत. 

‘हास्यजत्रेचा फील एकांकिकेसारखा..’

आणखी एका गोष्टीचं वाईट वाटतं, मला जेव्हा कोणी ओळखतं, याचा मला अनेकदा गिल्ट येतो, नकळतपणे. उदाहरण म्हणून एक प्रसंग सांगतो – एकदा ट्रेनने प्रवास करत असताना एका काकांनी मी मास्क घातलेला असताना फक्त डोळ्यांवरून मला ओळखलं. मी मास खाली केला. ते माझ्याशी बोलायला लागले. ते भावनिकरित्या ट्रिगर झाले होते. त्यांना मुलुंडला उतरायचं होतं, पण ते ठाण्याला उतरले. तेवढे भावनिक झाले होते की, त्यांनी मला मिठी मारली. ते रडले. त्यांनी मला सांगितलं, त्यांच्या आयुष्यात कोविडमध्ये काही गोष्टी घडल्या होत्या. अशा गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा मला छान वाटतं; पण मला खूपदा वाटतं की, मी खरंच हे प्रेम, आपुलकी, हे कौतूक खरंच माझ्या हक्काचं आहे का? मी हास्यजत्रेत कधीतरी जात असल्यामुळे हे जे कौतुक मला मिळतंय, हे त्या शोचं आहे. हे प्रेम आहे, ते हास्यजत्रेचं आहे. मला खूपदा असं वाटतं की, मी जर त्या शोमध्ये रोज काम केलं तर ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. त्या शोमध्ये गेल्यानंतर मला चार्ज झाल्यासारखं वाटतं. या शोमध्ये जाणं म्हणजे दर आठवड्याला तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं. हास्यजत्रेच्या शो मध्ये एकांकिकेचा फील आहे. हास्यजत्रेत जेव्हा मला काम करायला मिळतं ते अतिशय ठळकपणे, लोकांना चांगलं दिसेल असं मला करता येईल, अशी माझी इच्छा आहे, असं निमिष म्हणाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *