‘वेलकम’ चित्रपटातील अक्षय कुमारची मामी आठवते का? मुझसे शादी करोगी, जिस देश में गंगा रहता है, वेलकम या चित्रपटात झळकलेल्या या अभिनेत्रीचे नाव आहे सुप्रिया कर्णिक आहे. फार कमी जणांना माहित असेल की अनेक हिंदी सिनेमां मालिकांमध्ये झळकलेल्या सुप्रिया मूळच्या मराठी आहेत. मराठमोळ्या असलेल्या सुप्रियाचा मुंबईत जन्म झाला. अभिनेत्री सुप्रिया कर्णिक मुंबईतच लहानाची मोठी झाली. आई वडील आणि दोन मोठ्या बहिणी असे त्यांचे छोटेसे कुटुंब.
मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात
सुप्रिया यांनी लहान वयातच अनेक लहान सहन काम केली. मुलांचे ट्युशन घेतले, टायपिस्ट, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्येही काम केले. एवढेच नाही तर टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअरिंग अशी सर्व कामे केली. पुढे त्यांनी काही वर्षे सौदी अरेबियात बुरखा घालून एअर होस्टेसचे काम केले. मात्र तेथील कामाला कंटाळून ती पुन्हा भारतात परतली. एका मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने मॉडेलिंगमध्ये नशीब अजमाव्याच ठरवले.
१९९२ मध्ये कानून या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केलं. १९९६ सालच्या तिसरा डोळा या मराठी मालिकेत ती अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत झळकली होती. त्यांनतर अनेक मालिका चित्रपटात तिने काम केलं. मात्र इतक्या वर्षांत अभिनयक्षेत्रात नाव कमवत असतानाच वैयक्तिक क्षेत्रात मात्र अनेक चढउताराना समोर जावं लागलं.
2012 रोजी लग्न
२०१२ मध्ये त्यांच्या आयुष्यात अशी काही घटना घडली की ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून गेलं. दैनिक भास्करने दिलेल्या एका बातमीनुसार सुप्रिया कर्णिक लक्ष्मीकांत नायडू नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या. 29 मार्च 2012 रोजी या दोघांनी लग्न देखील केलं होते. मात्र, लग्नाच्या १० दिवसातच त्यांचा पती घरातून गायब झाला. इतकाच नव्हे तर जाताना तो घरातून ३५००० रुपये देखील घेऊन गेला असा दावा सुप्रिया यांनी केला होता. घडलेला हा प्रकार पाहून सुप्रिया यांनी पोलिसात धाव घेतली. धक्कादायक म्हणजे नायडू यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं लग्न मान्य केले नाही. अशावेळी सुप्रिया यांनी लग्नाचे पुरावे देखील पोलिसात सादर केले होते. सुप्रिया यांचा पती अनेक दिवस गायब होता.
एका मुलाखतीती बोलताना सुप्रिया म्हणाल्या, “मी अनेक वेळा प्रेमात पडले पण प्रेमात अनेकदा माझी फसवणूकच झाली. ज्यानी माझी फसवणूक केली त्या व्यक्तीला चोप देऊन लोळवले होत. शिवाय पुन्हा असा कोणत्या मुलीसोबत करशील तर याद राख अशी धमकी देखील दिली.”
सुप्रिया कर्णिक आजही सिंगल आहे. त्यानंतर लग्नाचा विषय देखील बाजूला गेला. या घटनेनंतर सुप्रिया आता अध्यात्माकडे वळल्या आहेत. अभिनयासोबत अनेक तरुण तरुणींना ती अध्यात्माचे धडे देखील देताना पहायला मिळते. शिवाय त्या अभिनय क्षेत्रात ही सक्रिय आहेत.