राहुल गांधी यांच्यावर भडकल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी, थेट गंभीर आरोप.. – Marathi News | Sonam Wangchuk wife is upset with Rahul Gandhi protest outside the PMO


नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीत जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना दिसले. आता सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, पीएमओ कार्यालयाबाहेर आंदोलन करणे अजिबात योग्य नव्हते. हे चुकीचे वागणे आहे. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले की, चुकीची माहिती देऊन चुकीचे काम करू शकत नाहीत. आम्ही अशा पक्षासोबत आणि अशा प्रत्येक व्यक्तीसोबत आहोत, जो चिंता करत आहे. पंतप्रधान यांच्या घराबाहेर आंदोलनावर त्यांनी म्हटले की, ते चुकीचे होते. त्यात प्रामाणिकपणाची कमी होती. जर त्याच्यात प्रामाणिकपणा असता तर ते जंतर मंतरवर येऊन विद्यार्थ्यांसोबत राहिले असते.

तुम्ही लोकांना पागल बनू शकत नाहीत. हा जागृत भारत आहे, इथे तुमच्या प्रामाणिकपणाची साथ मिळते. व्हिडीओ शेअर करत आम आदमी पार्टीनेही राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अरविंद केजरावील यांच्या पार्टीने एक्सवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, पीएम यांच्या निवासस्थानी केलेले हे आंदोलन पूर्णपणे बनावटी होते. जर विद्यार्थ्यांसाठी तुमच्या मनात काही भावना असत्या तर तुम्ही जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांसोबत थांबले असता.

सोनम वांगचुक यांच्या पत्नीने थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनात प्रियंका गांधी देखील सहभागी होत्या. काही काळ तणावाचे वातावरण होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

सोनम वांगचुक यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी रूग्णालयातून एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये विद्यार्थ्यांबद्दल बोलताना दिसले. जंतर मंतरवर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले आहेत. अभिजीत दिपके जंतर मंतरवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट परीक्षेच्या पेपरफुटीबद्दल मोठी घोषणा केली. कोणाचीही गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *