‘जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..’ संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस


MP Sanjay Patil: काय बोलू दे, XXच्या XXडीत गेलं आणि तुम्ही येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार आता. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय? कंप्लेंट करायचीये कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय, असा मस्तवालपणाचा कळस शिंदे गटात गेलेल्या खासदार संजय दीना पाटलांनी केला आहे. शिवसैनिकांना बंदूक आहे, बाॅम्ब टाकतो अशी धमकी दिलेल्या संजय दिना पाटलांची मस्ती आजही पत्रकारांसमोर दिसून आली. संजय पाटलांची मस्तवालपणाची भाषा संपूर्ण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

तर मारून पाठवणार तुम्हाला 

संजय पाटील म्हणाले की, उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उभा राहतो, जेवायला देतोय तुम्हाला, मी बोलणार नाही. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं, लिहायचं ते लिहा. लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. कशाला XXडीत घुसताय? बस झाला ना आता. तुला बोललो दोन मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो. बोललो ना भाई आता अजून किती? कशाला हे करतोय? 

आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत

संजय दिना पाटील आणि ठाकरे गटातील नेत्यांमधील वाद सध्या चांगलाच पेटला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांना थेट आव्हान देताना संजय दिना पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले होते. “माझ्या वाटेला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात! आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत,” अशी वादग्रस्त फुशारकी त्यांनी मारली होती. त्यांच्या या हिंसक वक्तव्याची गंभीर दखल घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून दिना पाटील यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

या संपूर्ण प्रकरणावर आणि पोलीस तक्रारीवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकार संजय दिना पाटील यांच्याकडे गेले असता, त्यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी पत्रकारांनी त्यांना त्यांची मुलगी आणि ठाकरे गटाची नगरसेविका राजुल पाटील यांच्या राजकीय भूमिकेविषयी परखड प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, दिना पाटील यांचा संयम सुटला. त्यांनी तिथे उपस्थित पत्रकारांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत त्यांच्याशी अत्यंत गैरवर्तन केले.

माईक माझ्या तोंडासमोर कशाला धरता?

माध्यमांच्या प्रतिनिधींवर आपला सगळा राग काढत ते संतापून म्हणाले, “तुम्ही तुमचे माईक माझ्या तोंडासमोर कशाला धरता? आता तुम्ही तिकडून (ठाकरे गटाकडून) सगळं ऐकून आलात ना, मग पुन्हा इकडे कशाला येताय आणि हे सगळं कशासाठी करताय?” या संतापानंतरही त्यांनी आपल्या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले. “मी जे काही बोललोय ते अगदी खुलेआम आणि जाहीरपणे बोललोय. माझ्यावर जी काही कारवाई करायची असेल ती पोलीस करतील. मी कोणत्याही प्रकारची कारवाई, चौकशी किंवा परिणामांना तोंड देण्यास पूर्णपणे तयार आहे,” असे त्यांनी छाती ठोकून आणि आव्हानात्मक सुरात सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *