पुण्यातील बिल्डरचं टोकाचं पाऊल, रविंद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल, CM फडणवीस म्हणाले… | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार रविंद्र धंगेकर, त्यांच्या पत्नीसह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस-रविंद्र धंगेकर
देवेंद्र फडणवीस-रविंद्र धंगेकर

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणी एफआयआर दाखल झाला असेल, तर पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील. कोणाचाही दबाव नाही. कायदेशीर प्रक्रिया पोलीस पार पाडत आहेत,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गुलटेकडी परिसरात राहणारे खलील शेख यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये विविध आर्थिक व्यवहारांमुळे आपण कर्जबाजारी झालो असून त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपल्या आर्थिक अडचणींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अनेक व्यक्तींची नावेही त्यांनी या व्हिडिओमध्ये घेतल्याचा दावा केला आहे.

रविंद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार रविंद्र धंगेकर, त्यांच्या पत्नीसह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर रविंद्र धंगेकर आणि इतर आरोपी पसार झाले.

पोलिसांवर कोणताही दबाव नाही, कायद्यानुसार कारवाई करतील

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असताना खलील शेख यांचे नातेवाईक गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरात त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र, सुरक्षा कारणास्तव पोलिसांनी त्यांना भेटू दिले नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाव नसून पोलीस स्वतंत्रपणे आणि कायद्यानुसार कारवाई करत असल्याचे सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

पुण्यातील बिल्डरचं टोकाचं पाऊल, रविंद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल, CM फडणवीस म्हणाले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *