मी कानाखाली मारली, शिव्या दिल्या…कपिल देव प्रचंड संतापले, युवराज सिंहवर बोलताना सगळं सांगून टाकलं! – Marathi News | Kapil dev said yuvraj singh no need to apology criticizes yograj singh


Kapil Dev And Yograj Singh : भारतीय क्रिकेट संघामधील दिग्गज माजी क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानं केलेली आहेत. भारताला 1983 सालचा विश्वचषक जिंकून देणारे भारतीय संघाचे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावरही योगराज सिंह यांनी टीका केलेली आहे. योगराज सिंह यांनी कपिल देव यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. नॉर्थ झोप, हरियाणा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाल्यानंतर कपिल देव यांनी मला क्रिकेट संघातून बाहेर काढले असा दावा योगराज सिंह यांनी यापूर्वी केलेला आहे. यावरच आता कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या मुलाकडे जास्त आयसीसी ट्रॉफी आहेत. कपिल देव हे फक्त एकच विश्वचषक जिंकू शकले, असेही योगराज सिंह यांनी याआधी विधान केलेलं आहे. या सर्व विधानानंतर युवराज सिंह यांनी मात्र आपल्या वडिलांनी केलेल्या विधानाबाबत माफी मागितलेली आहे. योगराज यांनी एकूण सात आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्त्व केलेले आहे. तर कपिल देव यांनी एकूण 131 कसोटी सामने आणि २२५ एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केलेले आहे.

कपिल देव नेमकं काय म्हणाले?

कपिल देव यांनी स्पोर्ट्स तकच्या एका पॉडकास्टवर योगराज सिंह आणि युवराज सिंह यांच्यावर प्रतिक्रिया दिली. “युवराज सिंहने माफी मागण्याची गरज नाही. तो एक महान क्रिकेटर आहे. तो एक चांगला खेळाडू राहिलेला आहे. त्यांनी क्रिकेटला जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्यावर लोकांनी खूप प्रेम केले. मी तर अजूही योगराज यांचा मित्र आहे. माझ्याकडून मला कोणतीही अडचण नाही,” असे कपिल देव यांनी स्पष्ट केले.

तुमचा स्वभाव जास्त कठोर असेल तर…

तसेच, कडवट स्वभाव असणाऱ्या लोकांना मला जास्त बोलावं वाटंत नाही. मला दिलखुलास लोकांशी बोलायला आणि भेटायला आवडते. तुमचा स्वभाव जास्त कठोर असेल तर लोक तुम्हाला भेटणं टाळतात, असेही मत कपिल देव यांनी व्यक्त केले.

मी उठून शिव्या दिल्या…

पुढे बोलताना तुम्हाला आयुष्यात सर्वकाही भेटत नाही. परंतु तुमचा स्वभाव एवढा कठोर नसावा. अशा लोकांना जगात जागा नसते. मी उठून शिव्या दिल्या, कोणालातरी कानाखाली मारलं तर कसं होईल, असं म्हणत माणसाचा स्वभाव चांगला असावा असं मतही कपिल देव यांनी व्यक्त केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *