माफीच्या साक्षीदारामुळे खटल्याचा विचका? कोर्टाचे कडक ताशेरे, गंभीर निरीक्षणं… काय काय घडलं कोर्टात? – Marathi News | Court delivered its verdict in the Pawanraje Nimbalkar case acquitting all the accused; read on to find out what transpired in court


पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. कोर्टाने निकाले वाचन केले. या निकालाचं वाचन करताना कोर्टाने काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. यावेळी कोर्टाने सीबीआय, पोलिसांच्या तपासावर ताशेरे तर ओढले आहेत. पण माफीच्या साक्षीदारावरच बोट ठेवलं. माफीच्या साक्षीदाराकडून दिलेल्या साक्षीवरच गंभीर प्रश्न निर्माण करत कोर्टाने कडक ताशेरे ओढले आहे. आरोपी, चालक आणि माफीच्या साक्षीदाराच्या साक्षी जुळत नाहीत, चालक आणि माफीचा साक्षीदार नागपूरला एकत्र गेले, त्याची साक्षही एकत्र जुळत नाही. त्यामुळे माफीचा साक्षीदार हा विश्वासू राहिलेलाच नाही, अशी गंभीर टिप्पणी कोर्टाने नोंदवली आहे. माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष बदलल्यामुळेच या खटल्याचा विचका झाल्याचं कोर्टाच्या निरीक्षणातून दिसून आलं आहे.

आतापर्यंतचा निकालाचा रोख हा पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचा नाही. आरोपींची गाडी जी जप्त केली होती ती जप्त करताना जळून खाक झाली होती. तिचा रंग दिसत न्हवता पण पंचनामा यादीत गाडीचा रंग हिरवा असे नमूद करण्यात आले आहे. गाडीचा रंग कळला कसा ? – कोर्ट गाडी किती रुपयांना घेतली. तिघांच्या माहितीत तफावत. तीन वेळा माफीच्या साक्षीदाराने वेगळी साक्ष दिली.

दोघेही गाडीने लातूरला गेले, तिथून शिर्डीला गेले. माफीचा साक्षीदार आणि पिंटू सिंग कुठे कुठे गेले हे जुळत नाही
साक्षीदार आणि चालकाच्या साक्षीत तफावत. माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय. तो सोयी नुसार साक्ष बदलतो. आरोपींचे संभाषण ज्या पिसियूवरून (फोनवरून) झाले त्याचाही सीडीआर कोर्टात सिध्द झालेला नाही – कोर्ट

महत्वाचा असा मानला जाणारा सीडीआरचा पुरावाही कोर्टासमोर सिध्द झालेला नाही – कोर्ट. फोन संभाषणाचे पुरावे कोर्टासमोर नाहीत. घटना घडली त्याचा तपशील माफीच्या साक्षीदाराने विस्तृत सांगितले आहे. पवनराजे निंबाळकर हे ज्या गाडीतून जात होते त्यांच्या मागून आरोपींनी पाठलाग केला. पवनराजे यांच्या ड्रायव्हरला आरोपींनी गाडी बाजूला घेऊन थांबण्यास सांगितलं.

गाडी थांबल्यानंतर आरोपींनी ड्रायव्हरला राजे साहेब कुठे आहेत असे विचारले आणि मागच्या सीटवर बसलेल्या पवनराजे निंबाळकर यांची काच खाली घेतल्यावर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. असा घटनाक्रम माफीच्या साक्षीदाराने सांगितला आहे. घटना कशी घडली याच रिक्रियेशन करण्यात आलेल नाही – कोर्ट फक्त ऐकीव माहितीवर कोर्ट विसंबून न राहता तथ्ये तपासण्यावर विश्वास ठेवते.

आधी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या अशी नोंद करण्यात आली होती. मात्र नंतर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या अशी करण्यात आलीय. एक अज्ञात दुचाकी पंजाब पासिंगची पोलिसांना कळंबोली परिसरात आढळून आलेली होती मात्र त्या वाहनाचा आणि या गुन्ह्याचा काही सबंध आहे का हे पोलिसानी तपासले नाही

सापडलेल्या दुचाकी गाडीचा तपास झाला नाही. आरोपी हत्येच्या नंतर मुंबईतून कसा बाहेर पडला त्याच्या तपशिलातही गोंधळ आहे. आरोपीने लग्न अटेंड केल, दारू प्यायला त्यानंतर अहमदाबादला गेला असाही तपशील आहे. आरोपीचा हा जबाब एका कथानकाप्रमाणे बसवण्यात आल्यच वाटतय. सरकारी पक्षाला सोयीस्कर वाटेल तसा जबाब घेण्यात आला आरोपीच्या हॉटेलचे चेक इन चेक आउटच्या वेळातही तफावत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *