सख्खा भाऊ असं कसं करु शकतो! मुलानेच आई-बहिणीसोबत ओलांडल्या सीमा; प्रत्येकजण त्या कृत्याने थरथरला | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Mumbai News : मालाडमधील नुकत्याच समोर आलेल्या घटनेने सर्वजण हादरुन गेले आहे. जिथं घरातील मुलाने आपल्या घरातील दोन महिलांसोबत अशं काही कृत्य केलं आहे ज्याने अख्ख मुंबई शहर हादरुन गेले आहे.

ख्ख्या आई आणि बहिणीसोबत मुलाने केलं असं काही की...
ख्ख्या आई आणि बहिणीसोबत मुलाने केलं असं काही की…

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरातून एक अत्यंत संतापनजक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आलेली आहे. राहत्या घरात सख्खा भावाने आपल्या 32 वर्षीय बहिणीसोबत आणि 68 आईसोबत अंगावर काटा आणणारा प्रकार केला असून याबाबत पीडित बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन कुरार पोलिसांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करत आरोपी भावाला अटक केली आहे.

वाचा नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार महिला मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेज या परिसरात आपल्या वयोवृद्ध आई आणि आरोपी भावासोबत वास्तव्यास आहेत. ही महिला सेल्स आणि मार्केटिंगचे काम करुन आपले घर चालवत असत. खरं तर या कुटुंबाच्या मालकीचा एक प्ल२ट असून त्यातूनच मिळणाऱ्या भाड्यावर त्यांचे जीवन चालते. आरोपीच्या बहिणीचे लग्न 2014 मध्ये झाले होते. पण पतीसोबत असलेल्या वादातून ती विभक्त होईन आपल्या आईसोबत राहत असे.

हे ऐकून थरकाप सुटेल

मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोपी भाऊ हा प्रॉपर्टीमध्ये स्वत:चा हिस्सा मागण्यासाठी आईसोबत वारंवार वाद घालत होता आणि तिच्यावर दबाव टाकत होता. 1 जुलै रोजी हा वाद अतिशय टोकला गेला. आरोपीने बहिणीला घरातून कधी जाणार, असा रागात बोलत आईसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. याच वादादरम्यान आरोपीचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या आईला जोरदार लाथ मारली.

आपल्या आईला होत असलेली मारहाण पाहून घरात असलेली बहीण धावत आली आणि तिला आईला भावापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण नराधम भावाचा राग शांत झाला नाही, त्याने आपल्या आईल वाचवायला आलेल्या बहिणीलाबी बेदम मारहाण केली आणि तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली.

मराठी बातम्या/मुंबई/

सख्खा भाऊ असं कसं करु शकतो! मुलानेच आई-बहिणीसोबत ओलांडल्या सीमा; प्रत्येकजण त्या कृत्याने थरथरला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *