मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक, लोकल ट्रेन्सचं टायमिंग कसं असणार? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Central Railway Sunday Mega Block: ठाण्याहून येणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकलही मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील.

मुंबई लोकल
मुंबई लोकल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात २८ जून, रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान असणार आहे.

त्यामुळे अनेक लोकल सेवा प्रभावित होणार असून, काही गाड्या वळवण्यात येणार आहेत, तर काही सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्य मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील.

त्याचप्रमाणे ठाण्याहून येणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकलही मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. या बदलांमुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या आणि तिथून सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना अधिक मोठा फटका बसणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेहून वाशी, नेरुळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या तसेच पनवेल, नेरुळ आणि वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *