कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी चिंताजनक बातमी, लिंबाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा | शेती बातम्या


Last Updated:

आज कांदा, लिंबू, आंबा आणि कलिंगडाची मोठी उलाढाल पाहायला मिळाली. काही बाजारांमध्ये आवक वाढली असताना काही ठिकाणी कमी आवकेमुळे दरात तेजी दिसून आली.

+

News18

News18

सांगली: राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज कांदा, लिंबू, आंबा आणि कलिंगडाची मोठी उलाढाल पाहायला मिळाली. काही बाजारांमध्ये आवक वाढली असताना काही ठिकाणी कमी आवकेमुळे दरात तेजी दिसून आली. राज्यभरात आज 1 लाख 25 हजार 611 क्विंटल कांद्याची आवक झाली. नाशिक बाजारात सर्वाधिक 62473 क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला. नाशिक मार्केटमध्ये कांद्याला 606 ते 2464 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच सोलापूर बाजारात आवक झालेल्या 88 क्विंटल कांद्यास 2400 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दर मिळाला.

लिंबाच्या बाजारातील आवक टिकून राहिली. राज्यभरात 555 क्विंटल लिंबाची आवक नोंदवली गेली. पुणे बाजारात 298 क्विंटल लिंबू दाखल झाले. त्यास सरासरी 2950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच जळगाव बाजारात आवक झालेल्या 2 क्विंटल लिंबूस प्रतीनुसार 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत लिंबाचा भाव आज सरासरी 500 रुपयांनी सुधारला.

राज्यभरात आज केवळ 840 क्विंटल आंब्याची आवक झाली. नाशिक बाजारात सर्वाधिक 230 क्विंटल आंबा दाखल झाला. तेथे आंब्याला 3000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सर्वाधिक दर मिळाला. तसेच सांगली बाजारात आवक झालेल्या 339 क्विंटल हापूस आंब्यास 16500 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सर्वाधिक भाव मिळाला. आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने उठाव वाढला आहे.

बाजारात कलिंगडास चांगली मागणी आहे. मुंबई बाजारात 1040 क्विंटल कलिंगडाची सर्वाधिक आवक झाली. 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कलिंगडाचे दर आज स्थिर राहिले.

मराठी बातम्या/कृषी/

कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी चिंताजनक बातमी, लिंबाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *