भारी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घ्यायचाय, पण बजेट फक्त 15 हजार रुपये? हे 5 ऑप्शन ठरतील बेस्ट  | टेक्नोलॉजी मराठी बातम्या


Last Updated:

तुम्हाला बेस्ट कॅमेरा क्वालिटी असणारे फोन खरेदी करायचे असतील. पण तुमचं बजेट हे 15 हजार रुपये असेल तर आज आपण पाच बेस्ट ऑप्शन जाणून घेणार आहोत.

बेस्ट कॅमेरा फोन
बेस्ट कॅमेरा फोन

मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोन ही आपली गरज बनली आहे. कोणत्याही कामासाठी आधी  स्मार्टफोन लागतो. पण स्मार्टफोनचा सर्वात मोठा वापर हा फोटो काढण्यासाठी होतो. लोकं स्मार्टफोन घेताना त्याचा कॅमेरा आधी चेक करतात. सोशल मीडियाचा वाढता वापर, रील्स बनवणे आणि हाय क्वालिटी फोटो क्लिक करण्याची आवड असणाऱ्यांसाठी बजेट स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. पहिले शानदार कॅमेरा फक्त महागड्या फ्लॅगशिप फोनमध्ये दिसायचा. पण आता फक्त 15 हजार रुपयांच्या बजेटमध्येही तुम्हाला भारी कॅमेरा पाहायला मिळतो.

तुमचं बजेट 15 हजार रुपये असेल आणि तुम्हाला जबरदस्त कॅमेरा क्वालिटीचा फोनहवा असेल. यासह बॅटरी डिस्प्ले आणि परफॉर्मेंसही दमदार हवा असेल. तर आज आपण अशा फोन्सचे पाच ऑप्शन कोणते हे जाणून घेणार आहोत.

पोको एम 7 प्रो 5 जी 

15 हजारांच्या बजेटमध्ये हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. कॅमेरा आणि डिस्प्लेच्या बाबतीत हा बेस्ट मानला जातो. यात 50 एमपीचा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशनसह येतो. ज्यामुळे कमी प्रकाशाही चांगला फोटो घेण्यात मदत मिळते. तसंच 20 एमपीचा फ्रंच कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी चांगला एक्सपीरियन्स देतो. या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत अंदाजे 14,999 रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम 35a 5G 

ज्या यूझर्सना विश्वासार्ह ब्रांड आणि चांगला कॅमेरा हवा आहे. त्यांच्यासाठी हा फोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. यात 50 एमपीचा मुख्य कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 एमपीचा तिसरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात 13 एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 6.6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळतो. हा फोनही तुम्ही 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. रॅम आणि स्टोरेजनुसार फोनची किंमत वाढू शकते.

रेडमी नोट 14 एसई 5जी 

तुम्हाला जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा घ्यायचा असेल तर हा रेडमी नोट 14 एसई 5जी फोन बेस्ट ठरतो. यात 100 एमपीचा प्रायमरी कॅमेरा दिला आहेत. जो हाय रिझॉल्यूशन फोटो घेण्यात सक्षम आहे. यासह 2 एमपीचं सेकेंडरी कॅमेरा आणि 16 एमपीचा फ्रंट कॅमेरा यात मिळतो. भारतात Redmi Note 14 SE 5G च्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ₹14,999 आहे.

CMF By Nothing Phone 1  

ज्या लोकांना स्टायलिश डिझाइनसह चांगला कॅमेरा हवा असेल तर CMF By Nothing Phone 1  फोनही बेस्ट ऑप्शन ठरतो. यात 50 एमपीचा ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप आणि 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळतो. जो चांगले डिटेल्स आणि नॅच्युरल कलरसह फोटो कॅप्चर करतो. फोनमध्ये 6.5 इंचांचं AMOLED डिस्प्ले आणि 5000 एमएएच बॅटरी दिली आहे. 6जीबी आणि 8 जीबी रॅमसह येणारा हा स्मार्टफोन स्मूथ परफॉर्मेंस देतो. 6 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत अंदाजे 15,999 रुपये आहे.

Vivo T4x 5G 

तुम्हाला कॅमेरासह दमदार प्रोसेसर आणि दीर्घ बॅटरी बॅकअप मिळेल असा फोन हवा असेल तर Vivo T4x 5G हा बेस्ट ठरू शकतो. यात 50 एमपीचा ड्यूअल रियर कॅमेरा आणि 16 एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *