भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं


ठाणे : राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाईचा धडाका लावला असून शिपायापासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये, अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आता, ठाणे एसीबीनेही अशीच धडाकेबाज कारवाई करत एका पोलीस हवालदारास रंगेहात अटक केली. भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि व्यवसायाला त्रास होऊ नये यासाठी 35 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला 30 हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना ACBने रंगेहाथ पकडले.

राजेंद्र कृष्णा पवार (वय 46), पोलीस हवालदार, बक्कल क्र. 3562, नेमणूक भोईवाडा पोलीस ठाणे, ठाणे शहर, असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराने 19 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईकडे याबाबत तक्रार दिली होती. पडताळणीदरम्यान तडजोडीनंतर 30 हजार रुपयांची लाच आरोपी पोलीस हवालदाराने मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, 20 ऑगस्ट रोजी कारिवली पोलीस चौकी परिसरात सापळा रचून तक्रारदाराकडून 30 हजार रुपये देण्याची योजना एसीबीने आखली. त्याचवेळी, आरोपील राजेंद्र पवार यांस लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीच्या अंगझडतीत Oppo Reno 11 मोबाईल आणि 18 हजार 650 रुपये रोख रक्कम आढळून आली. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या कारवाईने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा

ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *