पतीची हत्या करून अशा ठिकाणी पुरलं, ‘दृश्यम’पेक्षाही खतरनाक, 45 दिवसांनंतर रुबीचं कांड फुटलं! | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

18 मे रोजी सुरेंद्रची पत्नी रुबी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नवरा हरवल्याची तक्रार करते, पण 45 दिवसानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

पतीची हत्या करून अशा ठिकाणी पुरलं, 'दृश्यम'पेक्षाही खतरनाक, 45 दिवसांनंतर रुबीचं कांड फुटलं!
पतीची हत्या करून अशा ठिकाणी पुरलं, ‘दृश्यम’पेक्षाही खतरनाक, 45 दिवसांनंतर रुबीचं कांड फुटलं!

मुंबई : 18 मे रोजी सुरेंद्रची पत्नी रुबी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नवरा हरवल्याची तक्रार करते. रुबीच्या तक्रारीवरून पोलीस हरवलेल्या सुरेंद्रचा शोध घ्यायला सुरूवात करतात. पोलीस रात्रीचा दिवस करून सुरेंद्रला शोधत असतात ज्यात रुबीही त्यांची मदत करत असते, पण तरीही सुरेंद्र सापडत नाही, अखेर 45 दिवसांनंतर जेव्हा नातेवाईक रुबीची चौकशी करतात तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकते. आपणच सुरेंद्रची हत्या करून त्याचा मृतदेह बाथरूममध्ये पुरल्याचं रुबीने नातेवाईकांना सांगितलं.

फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला मृतदेह

रुबीने ही माहिती देताच नातेवाईक पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना सगळं सांगितलं, यानंतर पोलिसांनी बाथरूम खोदलं तेव्हा त्यांना सुरेंद्रचा मृतदेह मिळाला. पोलिसांनी सुरेंद्रचा मृतदेह फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. रुबीने सुरेंद्रची हत्या का केली? रुबीला आणखी कुणी साथ दिली का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

दारूमुळे पती-पत्नीमध्ये वाद

सुरेंद्र हा संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा. दारूमुळे पती आणि पत्नीमध्ये अनेकदा वाद व्हायचे आणि हे वाद रस्त्यावरही यायचे, काहीवेळा मारपीटही व्हायची, पण यात इतर कुणीही पडायचं नाही. प्रकरण इथपर्यंत जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, असं सुरेंद्रचा शेजारी बाबुलाल याने सांगितलं. सुरेंद्रचा मृतदेह त्याच्याच घरात पुरण्यात आल्याचं कळालं तेव्हा आसपासच्या भागात खळबळ उडाली

टेलरिंगचं काम करते रुबी

रुबी आग्र्याच्या सिकंदरामधील रुनकता धाम येथे टेलरचं काम करते. घरामध्येच राहून रुबी महिलांचे कपडे शिवायची. जवळच्या महिला तिच्याकडे सूट-सलवार शिवायला जायच्या, तिच्या हातात कला होती तसंच आसपासच्या भागात रुबी तिच्या टेलरिंगमुळे प्रसिद्ध झाली होती, पण रुबी असं काही करेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, असं बाबूलाल आणि त्याच्या पत्नीने सांगितलं.

मराठी बातम्या/देश/

पतीची हत्या करून अशा ठिकाणी पुरलं, ‘दृश्यम’पेक्षाही खतरनाक, 45 दिवसांनंतर रुबीचं कांड फुटलं!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *