Last Updated:
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा 160 रननी विजय झाला, याचसोबत न्यूझीलंडने 3 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-1 ने नावावर केली. या विजयासोबतच न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्येही धमाका केला आहे.
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा 160 रननी विजय झाला, याचसोबत न्यूझीलंडने 3 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-1 ने नावावर केली. या विजयासोबतच न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्येही धमाका केला आहे. या सामन्याच्या पहिल्याच इनिंगमध्ये न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम आणि डेवॉन कॉनवे यांनी दमदार शतकं ठोकत न्यूझीलंडला 438 रनपर्यंत नेलं. यानंतर इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 354 रन केले.
दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने 288 रन करून इनिंग घोषित केली, त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 373 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 210 रनवर ऑलआऊट झाला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्येही उलटफेर झाला आहे.
न्यूझीलंड फायनलच्या रेसमध्ये
तिसऱ्या टेस्टमध्ये विजय झाल्यामुळे न्यूझीलंड फायनलच्या रेसमध्ये आली आहे, तर टीम इंडियासाठी पुढचा रस्ता आणखी कठीण होऊन बसला आहे. या विजयासह न्यूझीलंड 72.22% PCT पॉईंट्ससोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (75%) आणि पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया ( 87.5%) आहे. टेबलमध्ये टीम इंडिया 48.15% PCT पॉईंट्ससोबत पाचव्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडची टीम सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात टीम इंडिया फायनलला पोहोचली होती. 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. यानंतर 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला क्वालिफाय होता आलं नाही. टीम इंडियाची पॉईंट्स टेबलमधली स्थिती बघता त्यांना या सत्रातही क्वालिफाय होणं कठीण झालं आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 29, 2026 11:42 PM IST
