Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठवडा बाजार परिसरातील रंगवाली नदीच्या शेंड्या डुब येथे ही घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एकावर उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये आवेश अजिज मक्राणी (10) आणि अमान जावीद सैय्यद (13) यांचा समावेश आहे. फरान अजिज मक्राणी (13) याची प्रकृती स्थिर; पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. डॉ. युवराज पराडके व वैद्यकीय पथकाचे जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
यामध्ये सख्ख्या दोन भावांपैकी लहान भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मक्राणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नवापूर पोलिसांकडून पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई सुरु
उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. नवापूर पोलिसांकडून पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. नदी, तलाव व धोकादायक जलसाठ्यांमध्ये मुलांनी आंघोळ करु नये, पालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये कारवर आणि तिथून जाणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीवर अचानक झाड कोसळळे
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील यशोधन नगर भागात 7 जुलैला मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर आणि तिथून जाणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीवर अचानक मोठे झाड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या अपघातात दृष्टी कदम ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्या पाठीला मोठी दुखापत झाली आहे. तिला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयाला जखमी तरुणीवर आवश्यक ते सर्व उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्तीच्या काळात एकाही नागरिकाचा मृत्यू होता कामा नये,” अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखालीच तरुणीचे पुढील उपचार सुरू असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन जखमी दृष्टी कदम आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेत धीर दिला. ठाणे महानगरपालिका प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा