धक्कादायक! जळगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मुलाचा घातपाताचा झाल्याचा वडिलांकडून  आरोप


Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जळगावात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घातपात झाला असल्याचा आरोप वडिलांकडून करण्यात येत आहे. शशिकांत कोळी असं 36 वर्षीय हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. शशिकांत सोबत राहणारी तरुणी आणि तिच्या साथीदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असा गंभीर आरोप वडिलांनी केला आहे. का गर्दी झाली म्हणून बघायला गेले तर रमेश पाटील यांना स्वतःच्याच मुलाचा मृतदेह दिसला.  

तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ 

जळगाव शहरातील  मोहाडी रोड परिसरात 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. शशिकांत रमेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, हा अकस्मात मृत्यू नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप मयताच्या वडिलांनी केला आहे. शशिकांत कोळी हा गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणीसोबत शिव कॉलनी परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी ती तरुणी आणि तिच्या साथीदारांसोबत वास झाल्यानंतर शशिकांत मोहाडी रोड परिसरात स्वतंत्र राहायला गेला होता. आज सकाळपासून शशिकांतचा फोन लागत नसल्याने त्याचे वडील रमेश कोळी हे शोध घेत असताना  मोहाडी रोड परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली.

 शशिकांतचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय

घटनास्थळी पोहोचल्यानंतर तो मृतदेह शशिकांतचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शशिकांतचे संबंधित तरुणीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर नाशिकहून एका तरुणाला बोलावून शशिकांतला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, एकुलता एक मुलाच्या मृत्यूनंतर शशिकांचे वडील यांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. शशिकांतच्या शरीरावर जखमा आहेत त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी रमेश पाटील यांनी केली आहे. दुसरीकडे मात्र शशिकांतचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला असला तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *