देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांना लगावला टोला


Chandrashekhar Bawankule : ज्येष्ठ मंत्री म्हणून जर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  केंद्रात गेले, चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतील, असं मला 100 टक्के वाटत असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. फडणवीसांनी 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावं अशीही टिप्पणी देखील त्यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, असा मोठा दावा बावनकुळेंनी केला आहे. 

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानावर भाजपचे नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना, महाराष्ट्रात 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, असा मोठा दावा केला आहे. राज्यामध्ये आमचे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. राज्याला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून लाभावे, ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची भावना आहे. बावनकुळे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले असून, महायुतीमधील आगामी समीकरणांबाबत विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मदतकार्यात राजकारण नको! विरोधकांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर

राज्यात घडलेल्या मोशी दुर्घटनेनंतर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे कामच केवळ आरोप करणे आहे, मात्र, सरकार संपूर्ण क्षमतेने मदत आणि बचावकार्यात व्यस्त आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. घडलेल्या दुर्घटनेवर बोलताना विरोधकांनी मदत आणि शोधकार्य संथगतीने सुरू असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. पण ही एक खूप मोठी घटना असून यामध्ये सर्वांना वाचवण्याचे व मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी, आमची संपूर्ण टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महानगरपालिकेची यंत्रणा अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी पूर्णपणे सक्रिय आहेत आणि मदतकार्य करत आहेत. विरोधकांनी काहीही दावे केले असले, तरी सरकार आणि संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणा लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी कटिबद्ध असून संपूर्णपणे कार्यरत आहेत, असा ठाम विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *