Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट… तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!


मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अचूक टायमिंग आणि विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या एका गंभीर कायदेशीर अडचणीत सापडल्याचं दिसतंय. चेक बाऊन्स (Cheque Bounce Case) प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) राजपाल यादव याला 7 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रत्येकी 3-3 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याच्यावर 7.35 कोटी रुपयांचा मोठा दंडही ठोठावला आहे.

मात्र, एवढी मोठी संपत्ती आणि कोट्यवधींचे प्रोजेक्ट्स हातात असतानाही राजपाल यादवला अवघ्या काही कोटींसाठी तुरुंगात का जावं लागत आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यावर स्वतः राजपाल यादवने यावर भाष्य केलं असून, हा वाद पैशांचा नसून ईगो आणि प्रगतीवर जळण्याच्या वृत्तीचा असल्याचा दावा त्याने केला आहे.

Rajpal Yadav Net Worth : 85 कोटींची संपत्ती आणि महागड्या गाड्या

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजपाल यादवची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. त्यांची एकूण संपत्ती (Net Worth) अंदाजे 50 ते 85 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तो केवळ चित्रपटांमधूनच नव्हे, तर रिअल इस्टेट आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठी कमाई करतो. ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून तो वर्षाला 30 ते 35 लाख रुपये कमावतो. त्याच्या ताफ्यात ऑडी (Audi) आणि बीएमडब्ल्यू (BMW) सारख्या अत्यंत महागड्या आणि लक्झरी गाड्या आहेत.

विशेष म्हणजे, राजपाल यादव सध्या एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतो. ‘भूल भुलैया 3’ मधील ‘छोटा पंडित’ या त्यांच्या लोकप्रिय भूमिकेसाठी त्याने सुमारे 1.25 कोटी रुपये मानधन घेतलं होते. तर आगामी ‘वेलकम टू द जंगल’साठी 1 ते 2 कोटी रुपये आणि ‘भूत बंगला’ या चित्रपटासाठी त्याने 1 ते 1.5 कोटी रुपये फी घेतल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, सध्या त्यांच्याकडे तब्बल 1200 कोटी रुपयांचे मोठे प्रोजेक्ट्स रांगेत आहेत.

Rajpal Yadav Case History : नेमकं काय आहे प्रकरण? 

शुभांकर मिश्रा यांच्या एका प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये बोलताना राजपाल यादवने या वादावर सविस्तर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाले की, “हा केवळ 5 कोटी रुपयांचा विषय असता, तर तो 2012 मध्येच संपला असता. पण या 5 कोटी रुपयांच्या वादाने माझे तब्बल 17 कोटी रुपये बुडवले. आम्ही एकत्र मिळून 22 कोटी रुपयांचा एक चित्रपट प्रकल्प (Project) सुरू केला होता. त्यावर 12 कोटी रुपये आधीच खर्च झाले होते आणि 70 टक्के चित्रपट तयार झाला होता. मात्र, समोरच्या कंपनीच्या चुकीच्या हेतूमुळे (Wrong Intention) तो प्रकल्प मध्येच रखडला आणि चित्रपट बुडाला.”

जोपर्यंत प्रेक्षक किंवा जनता एखाद्या चित्रपटाला नाकारत नाही, तोपर्यंत तो प्रकल्प थांबवण्याचा अधिकार कोणालाही नसतो. पण 2012 पासून समोरच्या पार्टीचा हेतूच वाईट होता, असा गंभीर आरोपही त्याने केला.

Actor Rajpal Yadav News : पैशांची नाही, ही तर अहंकाराची लढाई

राजपाल यादवने एका वृत्तपत्राशी बोलताना त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवर कडाडून टीका केली. तो म्हणाला की, “कधीकधी काही प्रकरणे ही पैशांपेक्षा जास्त समोरच्या व्यक्तीच्या जळफळाटातून निर्माण होतात. त्यांना माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवायची होती, ती त्यांना मिळाली. हा वाद आता पैशांचा राहिला नसून पूर्णपणे ईगोचा बनला आहे.”

या प्रकरणात आता तडजोड किंवा मध्यस्थी होणार का? असे विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. आता तडजोडीचा प्रश्नच उरत नाही. तडजोड तेव्हा होते जेव्हा लढाई दोन्ही बाजूंनी समान असते. इथे तर एका बाजूने पूर्ण कट रचण्यात आला होता. आता मी पूर्णपणे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालय जो देईल तो निकाल मला मान्य असेल,” असं राजपाल यादवने शेवटी सांगितले.

ही बातमी वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *